भारतातील सर्वात प्रशस्त तालीम ,अनेक तरुणांनी पटकावली पदके


   कुर्डूवाडी /(राहुल धोका) -छत्रपती शिवराय कुस्ती संकुल हि भारतातील सर्वात प्रशस्त तालीम कुर्डुवाडी येथे असून या तालमीतून आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त पैलवान तयार केलेले आहेत.  


       विशेष म्हणजे संस्थापक अध्यक्ष सुहास रिखवलाल शहा यांनी ही तालिम कोणतीही वर्गणी अथवा शासकिय मदत न घेता उभा केली आहे. तालमीच्या आत प्रशिक्षणासाठी प्रशस्त जागा, मैदान,मुबलक पाणी व निष्णात प्रशिक्षक हे या तालमीचे खास वैशिट्य आहे.


     कुस्ती सम्राट अस्लम काझी हे या तालमीत कोणतीही बिदागी न घेता प्रशिक्षण देतात. सध्या २५० तरुण येथे निवासी प्रशिक्षण घेत असून अंकुश अरकिले, श्रीहरी तरंगे, प्रमोद नरुटे त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण देत आहेत. शिवराय तालमीमुळे संपुर्ण सोलापूर जिल्हा व परिसरातील पैलवानांना प्रशिक्षणाची सोय या ठिकाणी झाली आहे.विशेष म्हणजे सदर प्रशिक्षणा साठी केवळ संकुलासाठी लागणारा मेंटनंन्स खर्च म्हणून अगदी माफक प्रशिक्षण फीचा आकार येथे घेतला जातो.शिवराय संकुलात आतापर्यंत अनेक कुस्ती सम्राट तयार केले.माऊली कोकाटे(राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता, त्रिमूर्ति केसरी अकलूज), विश्वजीत नरुटे (राष्ट्रीय रौप्यपदक विजेता), रविंद्र खैरे (राज्य स्पर्धा रौप्यपदक),सुनिल शेवतकर(नमो नमो केसरी धुळे, महावीर महाराष्ट्र केसरी,लातूर), महारुद्र काळवे (हवेली केसरी,मुळशी केसरी पुणे, राजमुद्रा केसरी कर्जत) ,दादा मुलाणी (भळसिध्द केसरी, मुंद्रुप) ,सागर मोटे (कामगार केसरी मुंबई, त्रिमूर्ति केसरी) ,सिध्दनाथ ओमणे( मागळवेढा केसरी),ओंकार हुलगे (राज्य स्तरीय रौप्यपदक) , आकाश अस्वले (राज्यस्तरीय ब्रांझपदक विजेता) असे अनेक पदक विजेते कुस्तीपटु या तालमीत निर्माण झाले आहेत .

       पोलिस व सैन्य भरतीतही त्यामुळे ग्रामीण  भागातील तरुणांना स्थान प्राप्त झाले आहे. ना नफा, ना तोटा अशी व्यवस्था निर्माण केल्याने या तालमीचे नागरिकांत विशेष कौतुक होत आहे.

 कुर्डूवाडी बनले पैलवान प्रशिक्षणाचे केंद्र Kurduwadi became center of wrestling training
 
Top