त्यासाठी लागणा-या सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील - आ.प्रशांत पारिचारक

     पंढरपूर,प्रतिनिधी - शहरातच नव्हे तर ग्रामीण भागामध्येहि क्रिडा क्षेत्रासाठी सोयी सुविधा उपलब्ध होवू लागल्या असून ग्रामीण भागातील हा क्रिडा क्षेत्राचा विकास उल्लेखनीय असल्याचा प्रत्ययच शुटर अर्थवच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या प्रशिक्षण केंद्रामुळे येत असल्याचे प्रतिपादन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले.

       पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव येथील शुटर अर्थव आनंदा शिंदे यांनी उभारलेल्या शुटिंग अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आ.शिंदे बोलत होते. कार्यक्रमासाठी आमदार प्रशांत परिचारक,सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे, विठ्ठल सहकारीचे चेअरमन भगीरथ भालके,डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील,पंढरपूर तहसिलदार विवेक साळुंखे ,जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारळकर, उद्योजक बाळासाहेब चव्हाण, पांडुरंगचे माजी व्हा.चेअरमन दिलीप चव्हाण, वसुदेव चव्हाण, दशरथ चव्हाण, ऍड विजय चव्हाण, आयोजक महेशकुमार कोरके, काकासो चव्हाण, शहाजी चव्हाण, मुख्याध्यापक बिभीषण पाटील, चित्रसेन पाथरूट, संजय पाटील, महादेव चव्हाण, किरण कोरके, नागनाथ राजमाने, उध्दव चव्हाण प्रशिक्षक प्रशांत मोरे,अविनाश गोसावी, आकाश गुजरे, हरिभाऊ होले, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी मृदुला मोरे, हर्षल होले, स्नेहल शिंदे,आश्विनी ढवळे, वैष्णवी खटावकर, शुटर अर्थव शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.

पुढे बोलताना आ.शिंदे म्हणाले कि, तरुणाईने क्रिडा क्षेत्रामध्ये असणाऱ्या कारिअरच्या संधीकडे ही कल दाखविला पाहिजे. बाभुळगाव सारख्या गावामध्ये अशी अकॅडमी होणे हे कौतुकास्पद असून इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

आ.प्रशांत पारिचारक यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले कि, या भागात अशी अकॅडमी होणे हे कौतुकास्पद असून यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. त्यासाठी लागणा-या सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत असे सांगितले.

यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. आभार महेशकुमार कोरके यांनी मानले.

 बाभुळगावसारख्या गावात क्रीडा अकादमी असणे कौतुकास्पद - आमदार बबनदादा शिंदे  It is commendable to have a sports academy in a village like Babhulgaon - MLA Babandada Shinde
 
Top