सिताराम महाराज साखर कारखान्याने एफआरपीचे ऊसाचे त्वरीत बील द्यावे- जनहित शेतकरी संघटनेची मागणी
  पंढरपूर,०१/०२/२०२१- पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याचे सन २०१८-१९ मधील गाळपास आलेल्या शेतकर्याच्या ऊस बिलाचे पैसे कारखान्याने अद्याप जमा केले नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. गेली दोन वर्षं झाली शेतकरी संघटना,उस उत्पादक शेतकरी व कारखानदार यांच्यात याबाबत संघर्ष होताना दिसत आहे.

  शेतकरी संघटनांनी आंदोलन केल्यानंतर १५००/- देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम कारखाना प्रशासनाने केले आहे.आता उर्वरित पैसे मिळवण्यासाठी शेतकरी हतबल झाला आहे.

     साखर कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांचा ऊस हा कारखान्याला गेल्यानंतर १५ दिवसांच्या आत एफ आरपी रक्कम शेतकर्याच्या खात्यावर जमा करावी असा कायदा असताना या कायद्याची अंमल बजावणी सिताराम महाराज साखर कारखान्याने केली नसल्यामुळे हा कायदा अक्षरशः पायदळी तुडवला आहे.

मात्र आता याबाबत दोन्ही कारखाने हात झटकत आहेत

      उस उत्पादक शेतकरी आधीच कोरोना आणि लाॅकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडला आहे. अगोदर कोरडा दुष्काळ आणि नंतर ओला दुष्काळ यामुुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आत्महत्या करण्याच्या निर्णयावर आला असून दोन वर्षापूर्वी गेलेल्या व शेतकर्याने जीवापाड जपलेल्या ऊसाचे ऊस बील त्यांचे घामाचे दाम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.काही उस उत्पादक शेतकर्‍यांनी सहकार शिरोमणी कारखान्याच्यावतीने ऊस सिताराम महाराज साखर कारखान्यास दिलेला आहे मात्र आता याबाबत दोन्ही कारखाने हात झटकत आहेत. 

         त्यामुळे आज पंढरपूर प्रांत आँफीसमध्ये जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी सचीन ढोले यांना निवेदन देण्यात आले.यावेळी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत नलवडे, तालुकाध्यक्ष सचिन आटकळे,ऊस उत्पादक शेतकरी प्रतिनिधी औदुंबर गायकवाड,महादेव गायकवाड, प्रकाश तनपुरे,सुधीर देशमुख आदी उपस्थित होते.

    आता जर वेळेवर ऊस बिलाचा हप्ता मिळाला नाहीतर ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाबरोबर कारखान्याच्या चेअरमनच्या आँफिसला कुलूप ठोकणार असल्याचे शेतकरी बांधवांच्या बोलण्यातून जाणवत आहे. 

ऊस बिलाचा हप्ता मिळाला नाहीतर तीव्र आंदोलन 
Intense agitation if sugarcane installment bill is not received
 
Top