नवी दिल्ली,PIB Mumbai,९ फेब्रुवारी २०२१- देशातील लहान मुले,युवावर्ग, प्रजोत्पादक वयोगटातील स्त्रिया यांच्यात आढळणारी समस्या  अनिमिया अर्थात रक्ताल्पता दूर करण्याच्या उद्देशाने २०१८ मध्ये एएमबी अर्थात रक्ताल्पता मुक्त भारत धोरणाची आखणी करण्यात आली. या धोरणा विषयीची कार्यान्वयन दिशादर्शक तत्वे, प्रशिक्षण आणि आयईसी अर्थात माहिती शिक्षण आणि संपर्कविषयक साहित्य तयार करून ते या धोरणाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले.


     सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एएमबी धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, रोग प्रतिबंधक लोह तसेच फॉलिक असिड यांची पूरक औषधे देणे,रक्ताल्पता असलेल्या व्यक्तींची निश्चिती करणे,त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणे यासारख्या  विविध उपक्रमांना सुरुवात केली आहे. सध्या हा कार्यक्रम प्राथमिक पायरीवर असून जनतेतील विशेषतः महिलावर्ग, लहान मुले आणि युवावर्ग यांच्यात आढळणारी रक्ताल्पतेची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने काम करीत आहे.

  देशातील २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आलेल्या एनएफएचएस- V अर्थात राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण – ५ ची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली.यामध्ये या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसंख्येच्या ६ ते ५९ महिन्यांची लहान मुले, गरोदर स्त्रिया,१५ ते ४९ वर्षे वयोगटातील स्त्रिया,१५ ते १९ वर्षे वयोगटा तील तरुणी आणि १५ ते १९ वर्षे वयोगटातील तरुण अशा विविध वयोगटांमधील व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या रक्ताल्पतेच्या समस्येसंबंधीची  आकडेवारी देण्यात आली आहे. 

रक्ताल्पता मुक्त भारताच्या उभारणीसाठी हाती घेतलेले उपक्रम Initiatives taken to build an anemia free India
 
Top