माय नेम इज टुडे -
भारतीय शेतकरी..... Indian farmers....

तो शब्दांचा जादूगार नाही,अक्षर गंध नाही
सही निशाणी अंगूठा आहे
तुकोबा तोंडपाठ आहे,ज्ञानोबा मुखात नांदतो
वारी चुकवत नाही,भाळी विठुचा टीळा
अंगावर जरुरीपुरता कपड़ा
तो स्वतः कांहीच लिहीत नाही वाचत नाही
पण तो निसर्ग वाचतो,तारे नक्षत्र जाणतो
पशुपक्षी निरक्षन उत्तम करतो
पावसाचा वेध बिनचूक घेतो
श्रमांच अमृताने काळ्या आईंची सेवा करतो
कष्ट ओतत राहतो
प्रत्येकाच्या पोटाच चांदणे पिकवतो 
जगाचा पोशिंदा म्हणून जगतो 
स्वतः कष्टात अन कर्जात झिजत राहतो 
तो उत्तम शल्यचिकित्सक 
डोक्यावर विश्वाचं ओझं वाहतो 
ऐक सेवाव्रत म्हणून !भूमातेवर उपचार करतो 
सेवा करतो पाऊस आला नाहीतर 
स्वताच्या घामावर शेतं पिकवतो 
मशागत करत राहतो असा भारतीय शेतकरी 
जीवन विद्यापीठाचा कुलगुरू 
लोकांसाठी जगतो लोकांसाठी मरतो 
प्रमुख असूनही बाजूला असतो 
तो सन्मानित नाही त्याच शोषण करणारे 
सावकार,उद्योगपति मात्र सन्मानित !
असं आजच चित्र आहे 
जातांना आपलं दुःख वेदना मूक्या करून 
अंतिम प्रवासाला जातो आता तर तो स्वतः च 
मरण कवठालतो तोच
या देशाचा कणा माझा भारतीय शेतकरी 
एकच विनंती फक्त त्यास आपल म्हणा !!
अन इज्जत देत त्याच वंदन करा !
फक्त वंदन करा !!

आनंद कोठडीया,कृषीरत्न,वादळ बंगला 
जेऊर,करमाळा,जि.सोलापूर ९४०४६९२२००


 
Top