कमी कालावधीत अभिजीत पाटील यांनी सहकार क्षेत्रात चांगला ठसा उमटवला - शेखर गायकवाड साखर आयुक्त In short span of time, Abhijeet Patil made a good impression in field of co-operation - Shekhar Gaikwad

  पंढरपूर / नागेश आदापूरे - धाराशिव साखर कारखाना, युनिट क्र.३ येथे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड व त्यांच्या पत्नी या उभयतांच्या हस्ते ४ लाख ९१ हजार १११  व्या साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.


       यावेळी संपूर्ण कारखान्याची त्यांनी पाहणी केली.साखर कारखानदारी अतिशय उत्तमरीत्या, सक्षमपणे चालवीत असल्याबाबत डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे कौतुक केले. हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवित असून अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि कुठेही गळती नसलेला असा कारखाना आपण प्रथमच पाहतो आहोत असेही साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले.

आपल्या कारखान्यची साखर पांढरी शुभ्र,दाणेदार आणि उत्पादनही अत्यंत उत्कृष्ट,असून या भागा तील सर्वसामान्य शेतकऱ्यांना या कारखान्यातून न्याय मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न या बंद कारखान्यामुळे ऐरणीवर होता. मात्र कारखाना चालू करून हा प्रश्न आपण मार्गी लावला त्याबद्दल कारखान्याचे संचालक व चेअरमन अभिजीत पाटील यांचे अभिनंदन साखर आयुक्तांनी केले.

        याप्रसंगी श्री.वांगे साहेब,श्री.वाडीकर साहेब, कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक भागवत चौगुले,संजय खरात,दिपक आदमिले,प्रगतशील बागायतदार ,केरू सावकार,  बाबा जामगे,ओंकार पाटील, गणेश रणदिवे,अक्षय रणदिवे तसेच जनरल मॅनेजर ढाके,चिफ इंजिनिअर पवार, चिफ केमिस्ट पेठे तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग व परिसरातील ग्राम पंचायत सदस्य आदींसह शेतकरी सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
 
Top