सद्य परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांनी सत्यात उतरवावेत-डाॅ.देवकते
In present situation,thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj should be made true by youth -Dr.Devkate

पंढरपूरात मराठा महासंघाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी

पंढरपूर - कोरोना कालावधीमध्ये सर्वांनी सतर्क राहावे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक तरुणांनी सत्यात उतरवावेत असे आवाहन मराठा महासंघा च्यावतीने घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने अध्यक्षस्थानावरून बोलताना बालरोग तज्ञ डॉ श्रीकांत देवकते यांनी केले.


   व्यासपीठावर शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्ष विजय डुबल व उपाध्यक्ष चरण गायकवाड, डॉ दीक्षित,डॉ मंदार सोनवणे, पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पोलीस निरीक्षक अरुण पवार, आढिव सरपंच मेजर चव्हाण,धनंजय कोताळकर, रमाकांत पाटील,निशिगंधा बँकेचे मॅनेजर कैलास शिर्के,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण तसेच महिला प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक रजनीताई जाधव,सौ.राधिकाताई चव्हाण, प्रा.प्रभावतीताई गायकवाड,अँड.प्राजक्ताताई शिंदे, सौ. रतनताई थोरवत उपस्थित होते.

मराठा महासंघाच्यावतीने घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमात डाॅ.देवकते बोलत होते. हिंदवी स्वराज्याचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते . आजच्या तरुण पिढीने त्यांचे विचार सत्यात उतरवण्याची खरी गरज आहे असे विचार व्यक्त केले.

समाजातील विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळावी यासाठी विविध उपक्रम राबवले

             अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती समाजातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची वाढ व्हावी तसेच चालना मिळावी या हेतूने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यापैकी २३ खेळाडूंना रोख रक्कम,सन्मानचिन्ह आणि पदक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.कोरोना कालावधीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डाँ पंकज गायकवाड,डॉ प्रताप घाडगे,डॉ संगीता पाटील आदींना मराठा महासंघाच्यावतीने कोरोना योद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

    यावेळी नैसर्गिक शेती करणारे शेतकरी वासुदेव गायकवाड,अमर ढोणे,प्रसाद पाटील,विकास डुबल यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पंढरपूर ते पश्चिम बंगाल हे बावीसशे किलोमीटरचे अंतर सायकल वरून पूर्ण केल्या साठी दिगंबर भोसले आणि सचिन राऊत यांचाही सन्मान करण्यात आला.

   जयंती कार्यक्रमासाठी सौ राजश्रीताई लोळगे,सौ.वनिताताई बनसोडे, अमृताताई शेळके,सौ साधनाताई राऊत सह सचिन गंगथडे, गुरुदास गुटाळ, संतोष जाधव, शिवाजी मोरे, सुनिल झिरपे, अमोल पवार, नागेश गायकवाड, पांडुरंग शिंदे, अतुल सावंत, सतीश धनवे सर, प्रणव गायकवाड, संतोष चव्हाण, काका यादव, शामराव साळुंखे, श्रीनाथ माने ,सोमनाथ पाटील उपस्थित होते.

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन थिटे, दिगंबर जाधव, महेश माने, प्रशांत जाधव, नितीन जगदाळे, संतोष घाडगे, महेश उंबरकर, नवनाथ आरे, रोहित राजे चव्हाण, वैभव राजे चव्हाण, भास्कर घायाळ, सागर माने, गणेश माने अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच सिंहगर्जना ग्रुपने विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गंगथडे सर यांनी केले.आभार संतोष चव्हाण यांनी मानले.
 
Top