डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना आदर्श उद्योजक पुरस्कार Ideal Entrepreneur Award to Abhijeet Patil, President, DVP Industries Group

 

    पंढरपूर,(नागेश आदापूरे) - दैनिक नवभारत वृत्तपत्र समुहाच्या दैनिक नवराष्ट्रच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा आदर्श उद्योजक हा पुरस्कार यंदा डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे. 


      उद्योग सांभाळतानाच अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न त्यांनी सोडविला आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमधून सामाजिक भान जपत युवकांना सकारात्मक कार्यासाठी संघटित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.उद्योग क्षेत्रात त्यांनी मिळवलेल्या कौतुकास्पद आणि दैदिप्यमान यशाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.

     पुणे शहरातील एम.एम.जोशी सभागृह येथे हा समारंभ घेण्यात आला. राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खा.गिरीश बापट, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले, श्रीनिवास रावू,पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, नवराष्ट्र पत्रकार राजेश शिंदे आदींची उपस्थिती होती.
 
Top