ग्रामपंचायत निवडणूकीत पंढरपूर भागातही  केले स्वतंत्र अस्तित्व

 दिलेल्या निमंत्रणांचा सन्मान राखत चेअरमन आवताडे यांचीही आवर्जून उपस्थिती

पंढरपूर ,प्रतिनिधी -पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून दोनवेळा चांगल्याप्रकारे मतदान घेतलेले उमेदवार चेअरमन आणि उद्योजक समाधान आवताडे यांच्यातील विकासाची तळमळ आणि  ध्यास असलेल्या या उमेदवारास यापुढील काळात संधी द्यायची, या उद्धेशाने पंढरपूर भागात अनेक कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण आवताडे यांना देण्याचे प्रमाण वाढले असून त्या निमंत्रणांचा आदराने स्वीकार करीत आवताडे हेही आवर्जून उपस्थित राहत आहेत.

पंढरपूर भागातून कमी मतदान झाले

     पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात मंगळवेढा शहर आणि सर्वच ग्रामीण भाग असून, यामध्ये पंढरपूर शहर आणि तालुक्यातील २२ गावांचा समावेश आहे. मागील दोनवेळा लढविलेल्या निवडणुकीत मंगळवेढा भागातील लोकांनी आपला उमेदवार म्हणून एक नंबरने मतदान केले होते. परंतु पंढरपूर भागातून कमी मतदान झाले होते.

      पंढरपूर भागात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चेअरमन समाधान आवताडे  यांच्या दामाजी परिवाराचेवतीने १७ गावात स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये जवळपास ४० ग्रामपंचायत सदस्य हे आवताडे यांच्या दामाजी परिवाराचे विजयी झाले आहेत. तर अनेक उमेदवार अल्पशा मताने पराभूत झाले आहेत. यामुळे विजयी असो अथवा पराभूत परंतु आपल्या हक्काची नेतेमंडळी गावोगाव निर्माण करण्यासाठी आवताडे यांना मोठे यश मिळाले आहे.

      मागील दोनवेळा झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर भागात जी मते कमी मिळाली होती, तेवढी मते प्लस करून एक हक्काचा मतदार दामाजी परिवारासाठी तयार झाला आहे.

     आगामी पोट निवडणुकीतही आवताडे यांनी कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी घेतली तरी पंढरपूर भागातून आता त्यांना हक्काचे मतदार आणि योग्य नेतेमंडळींचा मोठा आधार मिळणार आहे.

     ग्रामीण भागात २२ गावातून चांगली फळी तयार झाली असून पंढरपूर शहरातील कार्यकर्त्यांची एक मोठी फळी आवताडे यांचा दामाजी परिवार  मजबूत करण्यासाठी छुप्या पद्धतीने कार्यरत असून शहरातूनही बरेच सक्रिय कार्यकर्ते आतून कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातून झालेले कमी मतदान हे हक्काच्या मतदानामध्ये आणून ठेवण्यात सध्या तरी दामाजी परिवार यशस्वी झाला आहे असे वाटत आहे.शेवटी सर्वसामान्यांशी किती संपर्क साधला जात आहे यावर मताचे राजकारण अवलंबून आहे. 

पंढरपूर भागांत समाधान अवताडे यांचे वाढते आकर्षण Growing attraction of Samadhan Avtade in Pandharpur area
 
Top