सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर आराखडा सादर करण्याचे निर्देश उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांचे विधानभवन येथे आयोजित बैठकीत दिले.


 मुंबई - शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्या साठी महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्याच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रदूषण कमी करण्यासंदर्भात आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन व्यवस्थित होण्यासाठी विधिमंडळात यासंदर्भात काम करणाऱ्या संस्था आणि परिवहनमंत्री अनिल परब व नगरविकास विभागाच्या अधिकारी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते. 

सदरील बैठकीत सुम नेट इंडियाच्या प्रस्तावावर सार्वजनिक वाहतुकीबाबत सविस्तर आराखडा सादर करण्याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी निर्देश दिले. तसेच नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनीही याबाबत अभिप्राय द्यावे, महिलांसाठी तेजस्विनी सारखी बस सेवा सर्व शहरात सुरु होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने प्रयत्न करावेत अशी सूचना ना.डॉ.गोऱ्हे यांनी परिवहन आणि नगरविकास विभागास दिली.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थे संदर्भात जेंव्हा आपण पीपीपी मॉडेलचा विचार करतो तेव्हा त्याचे सनियंत्रण योग्य प्रकारे होणेही आवश्यक असल्याचे मत ना.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केले. सुम नेट इंडियानी त्यादृष्टीने पायलट बेसिस वर एक व्यवहार्य मॉडेल तयार करावे असे निर्देश दिले.  

सार्वजनिक वाहतुकीला सर्वात जास्त महत्त्व द्यावे अशी आमच्या सरकारची इच्छा आहे. लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळावे या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे. प्रबोधन आणि कायद्याने सुधारणा करण्यावर सरकारचा भर असल्याचेही परिवहनमंत्री ना.अनिल परब यांनी सांगितले.

  सदर बैठकीस नगर विकास विभागाचे सहसचिव पां.जो.जाधव,महाव्यवस्थापक बेस्ट सुरेंद्रकुमार बागडे,राजेंद्र जगताप- व्यवस्थापकीय संचालक, पुणे परिवहन महामंडळ ,प्रशांत काकडे संचालक केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था व इतर अधिकारी उपस्थित होते.

शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरू Government of Maharashtra is working to achieve Sustainable Development Goals
 
Top