उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार २०२० स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
Extension to send entries for Best Diwali Ank Award Competition

International Diwali Ank Museum
आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संग्रहालय

  जयसिंगपूर - ‘आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना’ आणि ‘आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संग्रहालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धा २०१९ चा निकाल नुकताच जाहीर कण्यात आला आहे.

    राज धुदाट यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रत्येक वर्षी साजरा होणारा पुरस्कार वितरण सोहळा आणि दिवाळी अंकांच्या संपादकांचे एक दिवशीय विशेष अधिवेशन यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केले जाणार नाही.

        यास्तव दिवाळी अंक पुरस्काराचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह भारतीय टपालाद्वारे पुरस्कार प्राप्त दिवाळी अंकांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच यावर्षी झालेल्या प्रदीर्घ जागतिक लॉकडाऊन आणि सामाजिकदृष्ट्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे निकालास विलंब लागला. मात्र सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

        १११ वर्षांची दिवाळी अंक परंपरा ही खास मराठी अभिरुचीचे प्रतीक आहे. दिवाळी अंकाची ही परंपरा वेगळ्या धाटणीत सुरू ठेवण्याचं काम आम्ही आनंदाने करत आहोत. ही परंपरा पुढेही अशीच सुरू राहील, अशी माहिती आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचे कार्यकारी संचालक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे . 

उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार २०२० स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.

उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार २०२० स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या दिवाळी अंक संपादकांना आपले दिवाळी अंक स्पर्धेसाठी पाठवावयाचे आहेत ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित असल्याबाबतचे आपले पत्र आणि आपल्या दिवाळी अंकांच्या ३ प्रती पाठवू शकतात.ज्या संपादकांनी यापूर्वी आपले दिवाळी अंक स्पर्धेसाठी पाठविले आहेत त्यांनी पुन्हा नव्याने पाठविण्याची आवश्यकता नाही. सदर दिवाळी अंक स्पर्धेत डिजिटल दिवाळी अंकांचा सुद्धा समावेश करण्यात आला असून डिजिटल दिवाळी अंकांच्या संपादकांनी आपल्या दिवाळी अंकाची पीडीफ संस्थेच्या इमेलवर पाठवावी. अधिक माहितीसाठी आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, द्वारा कवितासागर, पोस्ट बॉक्स ६९, जयसिंगपूर – ४१६१०१, जिल्हा – कोल्हापूर, दूरध्वनी ०२३२२ २२५५००, ९९७५८७३५६९, ८४८४९८६०६४, sunildadapatil@gmail.com येथे संपर्क साधू शकता असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
 
Top