अखेर पाणी सुटले...स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला आले यश...
Eventually water receded,battle of Swabhimani Shetkari Sanghatana was a success

      पंढरपूर,०९/०२/२०२१ - गेले कित्येक दिवसां पासून पंढरपूर तालुक्यातील सोनके तलावातून पाणी सोडले जात नव्हते त्यामुळे पंधरा वीस गावांमधील पिके पाण्यावाचून करपु लागली होती. मात्र फाट्याचे दार लुज झाल्यामुळे पाणी सोडण्यास अडचण येत होती.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल व जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पाटील यांनी वेळोवेळी प्रयत्न करणे चालु ठेवले होते. सोबत अभियंता श्री. म्हेत्रे यांचेदेखील प्रयत्न चालु होते.

     माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी या संदर्भात वरीष्ठ पातळीवर सुचना केल्या होत्या. काल मंत्रालयात जलसंपदा राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्याकडे ही समस्या सांगितली असता त्यांनी तात्काळ वरीष्ठ अभियंता फलटण श्री बोडके यांना काहीही करा पण तातडीने पाणी सोडा अशा सुचना केल्या त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले व आज अखेर पाणी सोडण्यात आले.अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजीत बागल यांनी दिली.

सोनके तलावातून पाणी सुटल्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
 
Top