सामाजिक उपक्रम राबवून केली छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती साजरी Establishment of a branch of Maratha Federation at Nepatgaon in Pandharpur taluka


    पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथे शिव जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर तसेच गावातील शाळांमधून सॅनिटायझरचे कॅन देण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयाला ही सॅनिटायझरचे कॅन दिले विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा या दृष्टीने विविध  कौशल्य कार्यक्रम राबवून शिवजयंती साजरी करण्यात आली प्रारंभी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या हस्ते मराठा महासंघाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्याधर भोसले यांनी आपले विचार मांडताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी कौशल्य वाढवत महापुरुषांचे विचार आत्मसात करावे व ते प्रत्येका पर्यंत पोहचवण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन केले.

   यावेळी बोलताना मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण म्हणाले की आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अंतर्गत कर्ज घेऊन मराठा समाजाच्या तरुणांनी लघुउद्योग तसेच इतर छोटे मोठे व्यवसायाच्या माध्यमातून पुढे यावे.शेतीबरोबरच जोडधंदा सुरू करावा. मराठा समाज कुठल्याही समाजापेक्षा मागे नाही हे दाखवून द्यावे. मराठा समाजाचे कार्य करत असताना आपल्याच बांधवाला हाताला धरून त्यालाही पुढे आणण्याचे काम या माध्यमातून करावे असे प्रतिपादन त्यांनी केले. 

    या कार्यक्रम प्रसंगी संग्रामसिंह देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव,जीवन गायकवाड, संतोष शिंदे, विक्रम गायकवाड, आनंद वाघ, नेपतगाव शाखाप्रमुख अजित कदम, उपप्रमुख अनिल कदम, तसेच अशोक कदम, नवनाथ कदम, आण्णा कदम, गुणाजी कदम, विकास कदम आदी उपस्थित होते. 

    यावेळी रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी कदम, परमेश्वर कदम, सुरज कदम, सुरज जगताप, समाधान कदम,सुशांत कदम,दिगंबर वाघ,श्रीराम कदम,दिगंबर वाघ तसेच शाखेचे विविध पदाधिकारी शिवप्रेमी तरुण मंडळ यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोसले सर यांनी केले.आभार प्रदर्शन बाळासो बुधनेर यांनी केले.
 
Top