भारतीय दूरसंचार उद्योगात मोठे बदल पाहायला मिळू शकतील

नवी दिल्ली,०६/०२/२०२१ - सध्या जगात सर्वात श्रीमंतांच्या यादीत असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ या कंपनीचे भारतीय दूरसंचार उद्योगात वर्चस्व आहे त्याला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्ककडून तीव्र स्पर्धा होऊ शकेल.एलोन मस्कची कंपनी, स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजीज कॉर्पोरेशन (स्पेसएक्स) स्टारलिंक प्रकल्प भारतात येण्यासाठी तयारीत आहे. त्यानंतर भारतीय दूरसंचार उद्योगात मोठे बदल पाहायला मिळू शकतील. स्पेसएक्स ही कंपनी सुरुवातीला १०० एमबीपीएस उपग्रह आधारित इंटरनेट सेवेद्वारे भारतीय बाजारात उतरण्याचा प्रयत्न करीत आहे.कंपनी भारत आणि चीन सारख्या १ ट्रिलियन डॉलर्सच्या बाजारपेठेत आपली सेवा सुरू करण्यासाठी उत्सुक आहे .

एलोन मस्क यांनी सरकारकडे परवानगी मागितली

     अ‍ॅनालिटिक्सइंडिमाग वेबसाइटच्या म्हणण्या नुसार,एलोन मस्क यांनी भारत सरकारमध्ये उपग्रह आधारित ब्रॉडबँड तंत्रज्ञान भारतात चालविण्यासाठी परवानगी मागितली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये भारतातील ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी एक सल्ला पत्र जारी केले.

         ७०० दशलक्ष इंटरनेट ग्राहकांसह भारत हा एक मोठा इंटरनेट वापरकर्ता बाजारपेठ आहे.२०२५ पर्यंत त्यांची संख्या ९७४ दशलक्ष होण्याची शक्यता आहे.सध्या इंटरनेटची गती १२ एमबी पीएस आहे.5 जीच्या आगमनाने भारतात इंटरनेटचा वेग नक्कीच वाढणार आहे .दुर्गम भागात फायबर ऑप्टिक केबल्स घालणे खूप महाग आहे. अशा परिस्थितीत एलोन मस्कच्या उपग्रहावर आधारीत इंटरनेट सेवेच्या मदतीने थोड्या वेळात स्वस्तात पोचता येईल.इतर पध्दतीने ग्रामीण आणि दुर्गम भागात जलद इंटरनेट सेवा पोहोचण्यास वेळ लागू शकतो परंतु हे काम स्पेसएक्सच्या स्टारलिंक प्रकल्पाने लवकर पूर्ण केले जाऊ शकते.150 एमबीपीएसपर्यंत गतीने तसेच कमी दरात ही सेवा उपलब्ध होऊ शकते.

एलोन मस्कची कंपनी भारतीय बाजारात उतरण्याच्या प्रयत्नात Elon Musk's company trying to enter the Indian market
 
Top