श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,पंढरपूरला इलेक्ट्रीक रिक्षा लोकार्पण सोहळा
Electric Rickshaw Dedication Ceremony at Shri Vitthal Rukmini Mandir Samiti, Pandharpur


     पंढरपूर - वेणू सोपान वेल्फेअर फाउंडेशन,पुणे व अँड . माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशन,पुणे यांनी पंढरपूर येथे श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रत्येकी एक नग प्रमाणे एकूण दोन इलेक्ट्रीक रिक्षा श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,पंढरपूरला सेवाभावी तत्वावर मोफत उपलब्ध करून दिल्या.त्याचा लोकार्पण सोहळा रविवार दि २१ फेब्रुवारी, २०२१ रोजी स. १०.०० वाजता श्री.संत नामदेव पायरी येथे संपन्न झाला . या कार्यक्रमास न्यायाधिश पंढरपूर अच्युत कराड , संस्थापक व्यसनमुक्त युवक संघ ह.भ.प. बंडातात्या कराडकर,संत नामदेव महाराज वंशज ह.भ.प.केशव महाराज नामदास,संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे वंश परंपरागत चोपदार ह.भ.प.राजाभाउ चोपदार, संस्थापक वारकरी पाईक संघटना पंढरपूर,ह.भ.प. राणा महाराज वासकर तसेच मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, ॲड.माधवी निगडे ,कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच सौ.वंदना बबनराव गायकवाड अध्यक्षा वेणू सोपान वेलफअर फाउंडेशन आदी उपस्थित होते . यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी व भाविक उपस्थित होते .


 सदरच्या दोन्ही इलेक्ट्रीक रिक्षा(RTGDA०६W / BOv ६ Seater with Forward Facing ८७०३) चौफाळा ते मंदिर व महाद्वार ते मंदिर दरम्यान अंध,अपंग,वयस्कर, गरोदर महिला इत्यादी साठी वापरण्यात येणार आहेत .या दोन्ही रिक्षांची अंदाजित किंमत रू.९.००/- लक्ष आहे .

    सदर कार्यक्रमाच्या दरम्यान कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सॅनिटाईजर व मास्कचा वापर करण्यात येवून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती .
 
Top