पंढरपूर - दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी कै लक्ष्मणराव दगडुजी शिंदे पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुमनबाई लक्ष्मणराव शिंदे ,राहणार मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती रक्कम रुपये एक लाख १००,०००/- रोख स्वरुपात देणगी दिली.

   त्यावेळी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्यावतीने श्रीमती सुमनबाई लक्ष्मणराव शिंदे यांचा सत्कार श्रींची प्रतिमा उपरणे श्रीफळ व हार देऊन विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस रुपये एक लाख रोख स्वरुपात देणगी Donation of Rs.one lakh in cash to Shri Vitthal Rukmini Mandir Samiti
 
Top