पंढरपूरात १५ फेब्रुवारीस बहुजन समता पार्टीची जिल्हा बैठक District meeting of Bahujan Samata Party on February in Pandharpur


       पंढरपूर ,प्रतिनिधी- बहुजन समता पार्टीच्या सोलापूर जिल्हातील पदाधिकारी , कार्यकर्त्यांची बैठक येत्या १५ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे पक्षाध्यक्ष प्रा डॉ मच्छिंद्र सकटे यांच्या अध्यक्षते खाली दुपारी एक वाजता पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे संपन्न होणार आहे,अशी माहिती जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे यांनी दिली आहे.

        या जिल्हा बैठकीमध्ये पंढरपूर ,सांगोला, मंगळवेढा, बार्शी,माढा ,मोहोळ ,माळशिरस या तालुक्यातील तालुका अध्यक्षांसह इतर पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात येणार आहेत.तरी इच्छुक कार्यकर्ते नेते यांनी दुपारी एक वाजता येथील शासकिय विश्रामगृह येथे बैठकीला उपस्थित राहावे असे आव्हान बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे यांनी केले आहे.
 
Top