DVP मॅरेथॉन उत्साहात संपन्न - अभिजीत पाटील

 

        पंढरपूर, ०७/०२/२०२१ - रनर्स असोसिएशन, पंढरपूर आयोजित DVP व्हर्च्युअल मॅरेथॉन आज रेल्वे मैदान पंढरपूर येथे संपन्न झाले. यावेळी DVP उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या शुभेच्छांनी मॅरेथॉनची सुरुवात झाली.


     या मॅरेथॉनमध्ये ५किमी,१० किमी व २१ किमी धावणाऱ्या अनेक धावपटूंनी सहभाग नोंदवला. २१ किमी हाफ मॅरेथॉन मध्ये पंढरपूर चिंचोली-भोसेच्या विकास शिंदे यांनी १ तास १५ मिनिटांचा विक्रम नोंदवत ही मॅरेथॉन पूर्ण केली. त्यांचे विशेष कौतुक अभिजीत पाटील यांनी केले.आरोग्य आणि सुदृढ जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी तसेच आरोग्यवान नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी या DVP मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर सुदृढता आणि आरोग्या विषयी अधिकाधिक लोक जागृत व्हावेत यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबिली गेली.


   प्रत्येक स्पर्धकाला आपआपल्या ठिकाणी स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यात संपूर्ण महाराष्ट्रातून यास उस्फुर्त प्रतिसाद प्राप्त झाला. आरोग्या विषयी जनजागृती होण्यास सहाय्य झाले तसेच पंढरपूरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गौरविले गेले याचे वेगळे समाधान वाटते असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

       यावेळी पंढरपूर रनर्स असोसिएशन, पंढरपूरचे सर्व सदस्य उपस्थित होते. 


DVP व्हर्च्युअल मॅरेथॉन पंढरपूर येथे संपन्न 
DVP Virtual Marrethon Pandharpur

 
Top