कुर्डुवाडीत कोरोना लसीकरणास सुरवात,लस सुरक्षित असल्याचा डॉक्टरांनी दिला संदेश Corona vaccination started in Kurduwadi,doctors gave message that vaccine is safe


       कुर्डुवाडी/ राहुल धोका - कुर्डूवाडी येथे दि ३ फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी ११ वाजता  कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. यावेळी धन्वंतरी देवतेचे पूजन नगराध्यक्ष समीर मुलाणी,  शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे,डॉ प्रद्युम्न सातव,डॉ प्रसन्न शहा,तालुका वैद्यकिय अधिकारी शिवाजी थोरात आदि मान्यवरांनी केले. 


    यावेळी शहरातील जेष्ठ डॉ विलास मेहता(वय७७) यांनी ही लस घेतली. ५१ वर्षापासून वैद्यकीय सेवा ते देत असून आज ही त्यांचा उत्साह कायम आहे. त्यांनी लस सुरक्षित असल्याचा संदेश हात उंचावून दिला.डॉ संतोष कुलकर्णी,डॉ आशिष शहा,डॉ रविंद्र बोबडे,डॉ लकी दोशी,डॉ निशांत शहा, डॉ सचिन मढेकर, डॉ संतोष दोशी,डॉ निर्मल बनसोडे, डॉ संतोष ताटे,डॉ रोहित दास,डॉ स्वाती ताटे, डॉ नितीन भोरे,डॉ नवजीवन शहा,डॉ मेघा शहा ,डॉ दिपाली शहा,डॉ स्नेहल दोशी,डॉ अनुज्ञा दोशी आणि उपस्थित मेडिकल स्टाफला लस देण्यात आली .  

    लस घेतल्यानंतर लस सुरक्षित असल्याची माहिती सोशल मिडीयाद्वारे देण्यास सुरवात केली आहे.सिरम कंपनीची कोव्हीशिल्ड ही लस ९५० मेडीकल ,पॅरामेडीकल स्टाफला देण्यात येणार  आहे. 

    यावेळी डॉ संतोष कुलकर्णी यांनी कोरोना लस  सुरक्षित असुन त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. कोणतीही भीती न बाळगता आपल्या क्रमाणे या लसीचे लाभ प्रत्येकाने घेऊन इतरांना प्रोत्साहित करावे असे आवाहन केले. डॉ गिरीश गव्हाणे,  वैद्यकीय अधिकारी नंदकुमार गोळवे ,डॉ सुनंदा रणदिवे,डॉ दिनेश कदम, डॉ रोहिदास दास, डॉ हर्षद दोशी,डॉ संतोष दोशी,डॉ नितीन मोरे आदि  उपस्थित होते. लसीकरण मोहिमेस मेडीकल स्टाफकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून या कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयतील सुनिता गिराम,शिवशाला सानप,संगीता भारती,कमर तांबोळी आदी अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
 
Top