सिरमच्या कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लसीचे केले स्वागत


कुर्डुवाडी/ राहुल धोका- कुर्डुवाडी शहरात ग्रामीण रुग्णालयात ९५० कोरोना प्रतिबंधक लसी दाखल झाल्या आहेत. सिरमच्या कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लसीचे स्वागत यावेळी केले गेले. मेडीकल व पॅरा मेडीकल स्टाफचे लसीकरण येथील ग्रामीण रुग्णालयात केले जाणार आहे.  सिस्टर सुनिता गिराम ,शिवशाला सानप यांनी या साठीचे प्रशिक्षण घेतले आहे. डाॅ सुनंदा रणदिवे गायकवाड, डाॅ प्रद्युम्न सातव, डाॅ प्रसन्न शहा, साह्यक अधिक्षक मोहन सबनिस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुरेश गोरे,उल्हास जाधव,राजाभाऊ मुंडे,  समुपदेशक कमर तांबोळी,सिस्टर अलिया शेख,  भारती यांनी उत्साहत या कोरोना लसीचे स्वागत केले असून यासाठी रजिस्ट्रेशन केलेल्या स्टाफचे लसीकरण सुरु  करण्यात येणार आहे.


कुर्डुवाडीमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण  Corona preventive vaccination in Kurduwadi
 
Top