व्यक्तीमत्व विकासात संभाषण कौशल्य महत्वाचे – डॉ.ज्ञानेश्वर सूर्यवंशी Conversational skills important in personality development - Dr.Dnyaneshwar Suryavanshi

    पंढरपूर – “अन्नप्रक्रिया उद्योग हा जागतिकीकरणात खूप संधी उपलब्ध करून देणारा आहे. यामध्ये यश संपादन करण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास होणे अत्यावश्यक आहे. व्यक्तीमत्व विकासात संभाषण कौशल्य हा वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे.इंग्रजी भाषा संपादन करण्यास सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे.” असे प्रतिपादन औरंगाबाद येथील डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी केले.

      रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क योजनेंतर्गत एक दिवसीय राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते. 

भाषेच्या अवलोकनासोबत नम्रता, सामाजिक भान याही बाबी अवगत केल्या पहिजेत

       डॉ.ज्ञानेश्वर सूर्यवंशी पुढे म्हणाले की, “इंग्रजी भाषा अवगत करण्यासाठी इंग्रजी बातम्या व चित्रपट पाहणे आवश्यक आहे.इंग्रजी संभाषणासाठी योग्य जोडीदार निवडून त्याच्याशी जमेल तसा संवाद केला पाहिजे. इंग्रजी विषयी असलेली अनाठायी भीती काढून टाकली तर ती अवगत करणे अधिक सोयीस्कर होते.भाषेच्या अवलोकनासोबत नम्रता, सामाजिक भान याही बाबी अवगत केल्या पहिजेत.

       अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे म्हणाले की,सकारात्मक आशावाद,भाषेची निवड, बोली,शब्दाचे उच्चार,शब्दसंग्रह हे महत्वाचे आहे. माणसांनी अधिक ऐकणे व कमी बोलणे याबाबी गरजेच्या आहेत. लेखन,वाचन,श्रवण व भाषण ही प्राथमिक कौशल्ये असून ती आत्मसात केली पाहिजेत. संभाषण कौशल्याच्या बळावर सर्वच क्षेत्रात प्रभाव निर्माण करता येतो.

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.समाधान माने यांनी केले. प्रमुख पाहुण्याचा परिचय बी-व्होक विभाग प्रमुख प्रा.रणजीत चौगुले यांनी केला.सूत्रसंचालन प्रा.प्रवीण शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.निंबराज तंटक, उपप्राचार्य डॉ.लतिका बागल,उपप्राचार्य चंद्रकांत रासकर, अधिष्ठाता प्रोफेसर डॉ.तानाजी लोखंडे, अधिष्ठाता डॉ.सुखदेव शिंदे,रुसा समन्वयक डॉ. बजरंग शितोळे,स्वायत्त समन्वयक डॉ.मधुकर जडल, महाविद्यालय अंतर्गत सुधार समितीचे समन्वयक डॉ.अमर कांबळे, कार्यालय प्रमुख अनंता जाधव आदी उपस्थित होते.

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.तेजस चौगुले, प्रा.अश्विनी जाधव,प्रा.परमेश्वर दुधाळ व प्रा.धनंजय वाघदरे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार प्रा.सुहास शिंदे यांनी मानले. 
 
Top