ग्रामीण भागातील मुले जिल्हाधिकारी होऊ शकतात- जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर
Children from rural areas can become Collector - Collector Shrikant Khandekar

मंगळवेढा - बनशंकरी ॲग्रो सर्व्हिसेस गुंजेगाव, ता मंगळवेढा जि सोलापूर या दुकानाचे उद्घाटन दि १९/०२/२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तात्रय पाटील होते. प्रमुख पाहुणे संजय पवार (पंचायत समिती सदस्य,दामाजी शुगर चे संचालक),समाधान जाधव (वि.का.सो.सा संचालक ओझेवाडी), पंडीतराव भोसले (अभियंता सा.बा ),विनायक यादव,बाबासाहेब रड्डी सर,आप्पासो चौगुले सर, सिद्धेश्वर पाटील ,हरिदास यादव,पप्पू दिवाण , महादेव ढोणे सर ,तुकाराम काळुंखे,श्रीनिवास गंगणे,गटू गणपाटील,अंकुश डूम आदी उपस्थित होते.

दिप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्याधर भोसले सर यांनी शिवचरित्र या विषयावर मार्गदर्शन केले.

    जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर यांनी तरूणांना मार्गदर्शन केले.ग्रामीण भागातील मुले जिल्हाधिकारी होऊ शकतात हे जिवंत उदाहरण आहे हे शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही आजच्या या युगामध्ये शिक्षणावर भर दिला पाहिजे असे मत व्यक्त केले.बनशंकरी  ॲग्रो सर्व्हिसेसच्या माध्यमा तून ग्रामीण भागातील शेतकरीवर्गाला शहरात जाऊन  खर्च करून औषधे व शेतीसाठी लागणारी सर्व साहित्य आणावे लागत होते ते आता आपल्या ग्रामीण भागातील शेतकरीवर्गाला उपलब्ध होणार असून या दुकानाच्या माध्यमातून खर्च वेळ कमी होणार आहे युवक वर्गाला शेती आणि शिक्षण हे दोन्ही विषय भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत यासाठी युवकांनी लक्ष केंद्रीत करून पुढील वाटचाली करावी ,असे प्रतिपादन केले.
 
       या कार्यक्रमाची प्रस्तावना दुकानाचे मालक सुनील चौगुले यांनी केले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सिद्धेश्वर पाटील यांनी केले .

  या कार्यक्रमासाठी दुकानाचे सर्व कर्मचारी आणि  शेतकरी उपस्थित होते.
 
Top