युटोपियन शुगर्स लि.कचरेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती

Chhatrapati Shivaji Maharaj jayanti at Utopian Sugars Ltd. Kachrewadi

  मंगळवेढा -हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती शुक्रवार दि.१९/ ०२/२०२१ रोजी युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी ता.मंगळवेढा येथे कारखाना कार्यस्थळावर उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” “जय भवानी जय शिवाजी” या घोषणेने सारा परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी युटोपियन शुगर्सचे डिस्टिलरी वेअर हाऊस सुपर वाईजर मोहम्मद अली पठाण यांनी शिवाजी महाराजांवर तयार केलेली अप्रतिम कविता सादर करून महाराजांना अभिवादन केले. युटोपियन शुगर्सच्यावतीने दरवर्षी दिमाखात शिवजयंती साजरी करण्यात येते. 

       यावेळी युटोपियन शुगर्सचे सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
 
Top