निपाणी,ता.१४/०२/२०२१ - दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्षपदी बोरगाव येथील सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली. रविवारी (ता.१४) बोरगाव अरिहंत सभागृहात झालेल्या दक्षिण भारत जैन सभेची मध्यवर्ती कार्यकारिणी सभेत सर्वानुमते निवड झाली.उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी पाटील यांचे नाव सुचविले.त्यास उपाध्यक्ष दत्ता डोरले व प्राचार्य डी.ए.पाटील यांनी अनुमोदन दिले .

   यापूर्वी २०१०,२०१४ ,२०१८ मध्ये पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर २०१० मध्ये लक्ष शाश्वत शिष्यवृत्ती योजना सुरू केली.५८ लाखांवर असलेला शिष्यवृत्ती फंड २ कोटी ६२ लाखांपर्यंत पोचला.पाटील यांच्या कारकिर्दीत मध्यवर्ती कार्यालय,हुबळीत कमर्शिअल कॉम्प्लेक्स ,धारवाडला जागा , स्तवनिधीत ब्रह्मनाथ भवन,कोल्हापुरात तीन मजली इमारत व एसी हॉल , सांगली, हुबळीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , जयसिंगपूरला वीर महिला मंडळ कार्यालय पद्मालयात एकरभर जमीन ,बोर्डिंग,श्राविका आश्रम,वसतिगृह ,बेळगावात पाच कोटींतून प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांचे स्मारक व निशिधीचे कामही प्रगतिपथावर आहे .निवडीनंतर दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवादल,वीर महिला मंडळातर्फे पाटील यांचा सत्कार झाला.

       अध्यक्षपदाचा पुन्हा मान मिळाल्याने समाज प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार , असे रावसाहेब पाटील यांनी सांगितले . 

     यावेळी कार्याध्यक्ष रावसाहेब जी.पाटील,मुख्य महामंत्री डॉ.अजित पाटील,संजय शेटे,पापा पाटील,प्रा डी.ए.पाटील , श्रीपाल जी.गंगवाल फुलचंद जैन तसेच सांगली,कोल्हापूर, औरंगाबाद ,विदर्भ,पुणे जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्षपदी सहकाररत्न रावसाहेब पाटील  Sahakarratna Raosaheb Patil as the President of South India Jain Sabha
 
Top