भंडीशेगाव येथे अनोखा व्हेलेंटाईन डे साजरा
सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या संकल्पनेतून साकारले बुद्ध पार्क Buddha Park realized from concept of Solapur Social Foundation


पंढरपूर,१४/०२/२०२१- जगात प्रेमाचा दिवस साजरा होत असताना भंडीशेगाव ,ता.पंढरपूर येथे सोलापूर सोशल फाऊंडेशनच्यावतीने बुद्घ पार्कचे व संगणक अभ्यासिकेचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांचे हस्ते करुन अनोखा व्हेलेंटाईन डे साजरा करण्यात आला.


       उद्योजक व सोलापूर सोशल फाऊंडेशनचे सल्लागार अजीत कंडरे यांच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस वायफळ खर्च न करता समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचे ठरले. त्यास भंडीशेगाव येथील तरुणांनी साथ दिली आणि गावा लगतच्या अस्वच्छ जागेवर एक सुंदर बुद्ध पार्क साकारले गेले.


      यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख यांनी बुद्ध पार्क हे सोशल फाऊंडेशनचे प्रथम माॕडेल असून प्रत्येक व्यक्ती,कुटूंब,गाव आत्मनिर्भर व समृद्ध  होण्यासाठी सोशल फाऊंडेशन सदैव तयार असून लघुउद्योग,बचतगट,शासकीय योजना ,स्वयंरोजगार निर्मितीसाठी सोशल फाऊंडेशन सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचेही सांगितले .
      
    यावेळी संगणक अभ्यासिका,कल्चरल हाॕलचेही उद्घाटन करण्यात आले आणि गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सत्कार करण्यात आला.

 बुद्ध पार्क निर्मिती व नियोजित विविध उपक्रमांची माहिती यावेळी उद्योजक अजीत कंडरे यांनी दिली.अंकुश पडवळे, गणपतराव माडगुळकर, अलिशा कंडरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्राताविक संतोष ननवरे,स्वागत डाॕ.श्रीधर यलमार , सुत्रसंचलन प्रशांत वाघमारे यांनी केले.

       यावेळी तहसिलदार विवेक साळुंखे,उद्योजक विजय कादे,मयुरी शिवगुंडे,मोहन अनपट,शहाजी देशमुख,विजय पाटिल,वनाधिकारी ठाकरेसाहेब, पंचायत समिती सदस्या पल्लवी यलमार, आबासाहेब दैठकर,राजाभाऊ माने,संजय रणखांबे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

     कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन , नवबुद्घ तरुण मंडळ व भंडीशेगाव ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
 
Top