सुगंधासाठी जन्मा आलो पण
सुगंध घेणारांनीच पायदळी तुडवले
ज्यांनी जोपायासाचे त्यांनीच
पोटासाठी खुडूनी टाकले !!१!!

सुगंधी आणि शोभेचे म्हणुनी जवळ केले
क्षणातच मला मातीमोल केले 
स्वार्थी माणसानीच माझे 
जगणे फुलणे निर्दयीपने हिरावुनी घेतले !!२!!

ते कधी माझेसाठी आले नाहीत ,
माझ्यासाठी कधीही राबले नाहीत 
मात्र माझ्या सुगंधावर आणि सौंदर्यावर 
हात टाकताना कधी लाजले नाही !!३!!

जग हे स्वार्थी,निर्दयी हे मला 
अखेर समजले आता पुन्हा येणे नाही 
येथे फक्त भोगी यांना 
कोणासही जगवणे माहित नाही !!४!!

ज्यांना समजत होते ते 
कवितेतच रमलेले होते 
त्यानाही अश्रू ढाळण्यासाठी 
वेळहि मिळाला नाही !!५!!

म्हणुनी आता मातीत विलीन झालो 
तरी खंत उरली नाही 
माणसाच्या या दुनियेत 
सौंदर्य अन सुगंधाला जागाच शिल्लक नाही !!६!!

आनंद कोठडिया,जेऊर 
०९४०४६९२२००

सुगंधासाठी जन्मा आलो पण....
Born for fragrance but ....


 
Top