गोवा इंडिया विंडसर्फिंग चॅम्पियन स्पर्धेत आर्यष मलपे यास मिळाले दुसरे पदक

     पंढरपूर,(प्रतिनिधी)- गोवा मध्ये नेव्हीने भरवलेल्या राष्ट्रीय विंडसर्फिंग स्पर्धा २७ ते ३१ जानेवारीमध्ये पार पडली त्यामध्ये एकूण ८४ स्पर्धकांचा समावेश होता.भारताच्या वेगवेगळ्या भागातून मुले व मुली तसेच वयस्कर गट यांचा समावेश होता. मुख्य म्हणजे यामध्ये सर्व स्पर्धक तीन भागात विभागले होते.

     त्यामध्ये ज्युनियर मुलांचा एक गट त्यात अठरा वर्ष आणि ३५ वर्ष त्याखाली स्पर्धक आणि तिसरा म्हणजे मास्टर गट त्यामध्ये ४० वर्षापेक्षा जास्त असलेले अशा या स्पर्धेत वेगवेगळ्या बोट यांचाही समावेश होता यात आरएसएक्स (ऑलिंपिक साठी वापरण्यात येणारी) आर एस वन रेस बोट, बिकनोवा आधी बोटींचा समावेश होता. त्यामध्ये बिकनोवा 5.5 मध्ये आयुष मलपे यांनी नेत्रदीपक काम करून राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला. त्याला या स्पर्धेची आवड मागील वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्विमिंग कॉम्पिटिशनपासून निर्माण झाली. त्याने मागील वर्षी गोवा राज्यां  मध्ये अव्वल स्थान मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली होती. मागील काही महिन्यांपासून covid-19 च्या प्रादुर्भावामुळे त्याला सेलिंगच्या  स्पर्धेसाठी भरपूर वेळ देता आला नाही पण थोड्याच वेळात त्यांनी चांगला सराव करून  द्वितीय क्रमांक पटकावला. त्यामध्ये त्यांच्या वडिलांचे चांगले मार्गदर्शन लाभले.ते सध्या  गोवा येथे नौदलात कार्यरत आहेत.

  या चिमुकल्याने दोन वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

    मागील वर्षी राष्ट्रीय स्विमिंग चॅम्पियनशिप मध्ये गोवा राज्याचे नेतृत्व केले होते.100 मीटर ब्रेस्ट मध्ये गोवा राज्यात यांनी अव्वल स्थान पटकावले होते.लहान वयात पंढरपूरच्या या स्पर्धकाने राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक केला आहे.

   गोवा इंडिया विंडसर्फिंग चॅम्पियन स्पर्धेत आर्यष मलपे यास मिळाले दुसरे पदक Aryash Malpe won the second medal in Goa India Windsurfing Championship
 
Top