मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांची पशुसंवर्धन मंत्री ना.सुनील केदार,पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचेेेकडे मागणी  

     पंढरपूर,प्रतिनिधी -सोलापूर जिल्हा हा शेती आणि शेती पूरक व्यवसायांवर जगत आहे.जनावरे पाळून दूध व्यवसायही मोठया प्रमाणात चालू आहे.परंतु या जिल्ह्यातील जनावरां साठी आवश्यक असणाऱ्या दवाखान्यातील प्रमुख पदे रिक्त असल्याने या भागातील जनावरांना उपचारासाठी मोठया अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जनावरांच्या दवाखान्यात रिक्त असलेली श्रेणी १ आणि श्रेणी २ ची पदाची त्वरीत भरती करून पशुधन वाचवावे अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रप्रमाणे किमान कंत्राटीवर तरी भरती करण्याची मांडली सूचना

     या देण्यात आलेल्या निवेदनात जर नवीन भरती करणे सरकारला अशक्य असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्याप्रमाणे कंत्राटी नेमणुका करून सेवा पुरविली जात आहे त्याच धर्तीवर जनावरांचे डॉक्टरांची नेमणुकाही कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी अशी सूचना ही मांडण्यात आली आहे.

     सोलापूर जिल्ह्यातील जे जनावराचे दवाखाने आहेत, यामधील जवळपास ६० ते ७० अधिकारी आणि कर्मचारी जागा रिक्त आहेत, त्यामुळे त्या त्या भागातील जनावरांना विविध प्रकारचे उपचार करणे अडचणीचे होत आहे. त्यासाठी सरकारने ही गंभीर बाब लक्षात घेऊन पशुधन आणि शेतकरी यांना वाचविण्यासाठी रिक्त जागा त्वरित भरून सेवा सुरू ठेवावी अन्यथा मनसे याच शेतकऱ्यां साठी रस्तावर उतरून आंदोलन करेल असा इशारा प्रशांत गिड्डे यांनी या निवेदनात दिला आहे.

    सदरचे  निवेदन देताना राहुल सुर्वे,संतोष गुळवे, अशोक भांगे,महादेव मांढरे,नितीन महाराज गडदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास तोडकरी यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्याचं पशुधन वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करा Appoint medical officers to save the livestock of the farmers
 
Top