पंढरपुरात कॉंग्रेस ओबीसी विभागाच्यावतीने महागाई विरोधात आंदोलन


          पंढरपूर,०५/०२/२०२१ - देशात सतत पेट्रोल- डिझेल त्याचबरोबर गॅसच्या वाढत असलेल्या दरामुळे सर्वसामान्य जनता हैराण झालेली आहे. केंद्र सरकार कायमच उद्योगपती यांच्या हिताचे निर्णय घेण्यात व्यस्त असल्याने सर्वसामान्य जनता त्यांच्या निर्णयामुळे भरडली जात आहे. याचा निषेध म्हणून आज पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पंढरपूर शहर कॉंग्रेस ओबीसी विभाग यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले व केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

यावेळी काँग्रसचे ज्येष्ठ नेते देवानंद इरकल, दत्तात्रय बडवे,सुहास भाळवणकर,जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस नागेश गंगेकर,युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित डोंबे,अमित अवघडे, समाधान रोकडे, राजाभाऊ उराडे, पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले,शहाजी शिंदे,राजाभाऊ देवकर, गणेश भोसले, विजय मेटकरी, पिंटू महागावकर, प्रशांत महागावकर,अर्जुन कांबळे यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    पंढरपूर शहर कॉंग्रेस ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष मधुकर फलटणकर म्हणाले की, पेट्रोल,डिझेल व गॅसची वारंवार दरवाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे मुश्कील होत आहे.वारंवार गॅसची दरवाढ होवूनही त्याचे अनुदान ग्राहकाच्या खात्यावर जमा होत नाही फक्त दरवाढ मात्र नेहमी होत आहे, यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाचा आम्ही निषेध व्यक्त करतो.

पंढरपुरात कॉंग्रेस ओबीसी विभागाच्यावतीने महागाईविरोधात आंदोलन Anti-inflation agitation on behalf of Congress OBC department in Pandharpur
 
Top