विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांच्या स्थानिक आमदार निधी २०२०-२१ च्या कार्यक्रम अंतर्गत गोंदवले खुर्द ग्रामीण रुग्णालय, म्हसवड जि. सातारा येथे रुग्णवाहिकेस १२.५० लक्ष निधी...

पुणे दि.०५ /०२/२०२१ -कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाला मोठ्या प्रमाणात हाल होत होते. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्थानिक आमदार निधी कार्यक्रमा अंतर्गत वैजापूर, कन्नड या ग्रामीण रुग्णालयांना निधी उपलब्ध करून दिला आहे. पुण्यात ससुन हाँस्पीटलला आणि पुणे महानगरपालिका येथील हॉस्पिटला एकूण २० लक्ष रु निधी उपलब्ध करुन दिला आहे.

याचाच भाग गोंदवले खुर्द,म्हसवड जि.सातारा येथे माणदेशी फाउंडेशन तर्फे ग्रामीण रुग्णालयात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.याचे उद्घाटन ना.डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते झाले होते.यामुळे कोरोनाच्या काळात रुग्णांना खूप मोठा आधार मिळाला होता.याठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत माणदेशी फाऊंडेशनच्या श्रीमती चेतना सिन्हा यांनी ना.डॉ.गोऱ्हे यांच्याकडे विनंती केली होती. या रुग्णालयासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी ना.डॉ.गोऱ्हे यांनी स्थानिक आमदार निधी २०२०-२१ मधून १२.५० लक्ष रु देण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात पत्र सातारा जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी हाल होणार नाहीत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमती सिन्हा यांनी डॉ.गोऱ्हे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी हाल होणार नाहीत रुग्णवाहिका Ambulances will not be available for the treatment of patients in rural areas
 
Top