अकोला, १२/०२/२०२१- महाराष्ट्र शासन प्रतिबंधित सुगंधित तंबाखुची विक्रीकरीता वाहनात लपवुन वाहतुक करणाऱ्या अंतरराज्या टोळीवर स्था.गु.शा.पथकाने कारवाई केली .आज दिनांक ११/०२/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली कि , एक मालवाहु ब्राउन रंगाचा आयशर कमांक GJ - 27 - X - 6763 मध्ये निळया - पांढर्‍या रंगाचे नायलॉन पोत्यांमध्ये महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत नशाकारक व जिवितास अपायकारक सुगंधीत तंबाखु अकोला येथुन NH - 6 हायवे रोडने अमरावतीचे दिशेने जाणार आहे.

     या खात्रीलायक बातमीवरुन स्थागुशा पथकाने पंचांसह शिवणी टि.पॉईट येथे नाकाबंदी करुन गुप्त माहीतीप्रमाणे एक मालवाहु ब्राउन रंगाचा आयशर थांबवुन त्यातील दोन इसमांना खाली उतरवुन त्यांना पंचांसमक्ष त्यांचे नाव व पत्ता विचारला असता चालकाने त्याचे नाव मेहबुबमियाँ पिरसाहबमियाँ वय -४५ वर्ष रा- ग्राम आमसरन ,उडीफली मोहल्ला,ता. मेहमदाबाद ,जि.खेडा , राज्य गुजरात आणि चालकाचे साथीदारांने त्याचे नाव रहीममियाँ अहमदमियाँ मलीक वय -३२ वर्ष ग्राम आमसरन,बिचवाला मोहल्ला,ता. मेहमदाबाद,जि.खेडा,राज्य गुजरात असे सांगितले. त्यांना गाडीतील मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी वाहनातील संशयित निळया पांढर्‍या रंगाचे नायलॉन पोत्यांबाबत असमाधानकारक उत्तरे दिल्यावरुन सदर आयशर पो.स्टे . एमआयडीसी येथे डिटेन करुन वाहनातील २७ नायलॉनची मोठे पोतेची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत नशाकारक व जिवितास अपायकारक सुगंधीत तंबाखू भाज्य ग्लोबल तंबाखु पॅकेट असलेले २० निळ्या रंगाचे मोठे नायलॉन पोते किं.अ. ६,१६,८८० / -रु .२ ) ईगल तंबाखुचे पॅकेट असलेले ७ पांढऱ्या रंगाचे मोठे नायलॉन पोते किं.अं. ३,५१,५४० / -रु असा एकुण ९,६८,४२०/ -रु वा मुद्देमाल व एक मालवाहु ब्राउन रंगाचा आयशार कमांक GJ-27-X - 6763 किं.अं .११,००,००० / - असा एकुण २०,६८,४२० / -रु चा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेतला.वाहन चालक व त्याचे साथीदारास सदर वाहन व माला बाबत विचारपुस केली असता त्यांनी वाहन व माल पलक रोडवेजचे मालक विनोद कुमार शर्मा , अहमदाबाद ,गुजरात यांचा असल्याचे सांगितले. याबाबत पोलिस स्टेशन एमआयडीसी येथे गुन्हा दाखल प्रक्रिया सुरु आहे .

     सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक जी.श्रीधर,अपर पोलीस अधिक्षक श्रीमती मोनिका राउत मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांचे आदेशाने स्थागुशा पथकातील पोउपनि सागर हटवार, पोहेकॉ सदाशिव सुळकर,पोकॉ मोहम्मद रफी,अब्दुल माजीद, रवी इरच्छे ,एजाज अहमद चालक पोकॉ प्रविण कश्यप,विजय कबले यांनी केली .

      सुगंधित तंबाखुची वाहनात लपवून वाहतुक करणाऱ्या अंतरराज्य टोळीवर कारवाई Action taken against inter-state gang for smuggling scented tobacco in a vehicle
 
Top