संचारबंदीत पोलीस बांधवांसाठी फराळ आणि जेवणाची व्यवस्था करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा अभिजित पाटील यांचा अनोखा प्रयत्न
Abhijit Patils unique attempt to express gratitude by arranging farewells and meals for police


  पंढरपूर - माघीवारी असल्यामुळे श्री क्षेत्र पंढरपूर व इतर दहा गावांमध्ये संचारबंदी लागू केली होती. त्याअनुषंगाने पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी जवळपास ३००० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. संचारबंदीमुळे कोणतेही हॉटेल उघडणार नाहीत यातून पोलिस बांधवांची गैरसोय होऊ शकते म्हणूनच त्यांच्यासाठी डीव्हिपी उद्योग समूहाचे संचालक अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून सकाळचा नाश्ता/फराळ,दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण देण्यात आले.त्यामध्ये केळी,पाणी बॉटल,खिचडी यांचाही समावेश होता.

     कोणताही सण,उत्सव असो आपला परिवार, आपला आनंदउत्सव बाजूला ठेवून २४/७ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बांधव अव्याहत तत्पर असतात. समाजासाठी त्यांचे कार्य अत्यंत अमुल्य असल्याने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न आहे,असे अभिजित पाटील यांनी यावेळी सांगितले.

   यावेळी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण पवार,सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री.जाधव, श्री.गरड साहेब,श्री.आर्किले साहेब,पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, डिव्हीपी उद्योग समूहाचे अभिजीत कदम,परवेज मुजावर,शरद घाडगे,शरद चव्हाण तसेच इतर पोलीस बांधव होते.
 
Top