पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीच्या एकमताने निवडी

पंढरपूर /प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूरच्या अध्यक्षपदी यशवंत कुंभार , उपाध्यक्षपदी विजयकुमार कांबळे ,सचिवपदी सुरेश गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.पत्रकार संघाच्या पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या.

पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी

शुक्रवार दि.१ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज मठामध्ये पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत या निवडी एकमताने घोषित करण्यात आल्या. संघाच्या अध्यक्षपदी यशवंत कुंभार ,उपाध्यक्षपदी विजयकुमार कांबळे ,सचिवपदी सुरेश गायकवाड तर खजिनदारपदी श्रीनिवास उपळकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

या निवडीनंतर संघाचे माजी अध्यक्ष रामचंद्र सरवदे आणि संघाच्यावतीने नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.

नूतन पदाधिकारी निवडीच्या संदर्भात झालेल्या पत्रकार सुरक्षा समितीच्या या बैठकीस पत्रकार संघाचे मार्गदर्शक अविनाश साळुंखे ( दै.दामाजी एक्सप्रेस ), राधेश बाधले-पाटील ( संपादक सा. राष्ट्रसंत),अपराजित सर्वगोड (दै.एकमत ),चैतन्य उत्पात (गोफण न्यूज ), राजेश शिंदे (दै. नवराष्ट्र), दत्ताजी पाटील (संपादक, सा.सत्यता) यांचेसह बाहुबली जैन (दै.सोलापूर भूषण), अमोल गुरव (दै.कटू सत्य),मारुती वाघमोडे (दै.एकमत), भैरवनाथ कडाळे (स्वराज न्यूज चॅनल),राजेंद्र काळे (दै. जनसत्य), संजय यादव (संपादक सा. पंढरी तडाका),रामकृष्ण बिडकर (संपादक सा. पंढरी संदेश), प्रकाश सरताळे (समृद्धी न्यूज), रवी शेवडे (लोकप्रवाह न्यूज),विश्वास पाटील (दै. लोकवार्ता),अमर कांबळे (सहसंपादक सा.युवक आघाडी),कबीर देवकुळे आदी सदस्य उपस्थित होते.

पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी यशवंत कुंभार,उपाध्यक्षपदी विजयकुमार कांबळे 
yashwant kumbhar as the chairman of pandharpur patrakar suraksha samiti and vijaykumar kamble as the vice chairman
 
Top