पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन सुरूपंढरपूर,(प्रतिनिधी),०५/०१/२०२१- पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, जनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर,कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांची गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न झाल्याने व शासनाने सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम नगरपरिषदेला न दिल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून दोन महिन्याचे वेतन मिळेपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात आले आहे .


   जोपर्यंत दोन महिन्याचे वेतन मिळत नाही व यापुढे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकाना सहाय्यक वेतन अनुदान हे एक ते पाच तारखेच्या आत मिळावे व सहाय्यक वेतन अनुदानात असणारा सहाय्यक हा शब्द काढून वेतन अनुदानच प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नगरपालिकांना देण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे .


    हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कामगार नेते नागनाथ तोडकर, उपाध्यक्ष जयंत पवार,अनिल गोयल, संतोष सर्वगोड, किशोर खिलारे,संजय माने,दत्तात्रय चंदनशिवे ,धनजी वाघमारे, चिदानंद सर्वगोड, अनिल अभंगराव,रवींद्र वाघमारे,सुनील सोनार , संजय वायदंडे ,पराग डोंगरे हे प्रयत्न करत आहेत. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना  मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन सुरू 
work stoppage agitation started on behalf of pandharpur municipal council workers union 
 
Top