शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा किंवा शेतकऱ्यांचा मी कधीही अवमान केला नाही,माझ्याविरुद्ध गैरसमज पसरविणे थांबवावे -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

        मुंबई दि.२८/०१/२०२१ - शेतकऱ्यांच्या हिताचा आम्ही नेहमी विचार केला आहे.शेतकऱ्यांचा अवमान आम्ही कधीही केला नाही.शेतकऱ्यांच्या मुंबईतील आंदोलनाला प्रसिद्धी स्टंट मी कधीही म्हणालो नाही.माझ्या विरुद्ध गैरसमज पसरविणे थांबवावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून ना रामदास आठवले यांच्यावर शेतकाऱ्यांचा अवमान केल्याचा खोटा आणि खोडसाळ प्रचार चालविला जात आहे त्याला उत्तर देताना ना रामदास आठवले यांनी खुलासा करणारे पत्रक आज प्रसिद्धी माध्यमांना पाठविले.

मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून काहीजण  माझ्याबाबत गैरसमज पसरवीत आहेत

        याबाबत खुलासा करताना ना रामदास आठवले यांनी कळविले आहे की दि.२४ जानेवारीला पुण्यातील पत्रकार परिषदेत शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात शरद पवार यांनी मध्यस्थी करावी असे मी आवाहन केले होते.मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्याबाबत गैरसमज पसरवीत आहेत.ते त्यांनी त्वरित थांबवावे.

   दिल्लीत शेतकरी ज्या नवीन कायद्याविरुद्ध आंदोलन करीत आहेत.त्या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकार स्थगिती देत आहे. त्यामुळे आंदोलन करण्याचे कारणच उरले नसताना ते आंदोलनाचा अतिरेक कशासाठी करीत आहेत.शेतकऱ्यांनी आंदोलन आता मागे घ्यावे असे मी पुण्यातील पत्रकार परिषदेत आवाहन केले होते.त्या दिवशी मुंबईत आझाद मैदानात शेतकऱ्यांचा मोर्चा पोहोचला नव्हता. दि.२५ जानेवारीला शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला त्या दिवशी मी मुंबईत नव्हतो तर दुबईत होतो.त्यामुळे मी मुंबईतील शेतकरी मोर्चाबद्दल काहीही बोललो नाही.मी दि.24 जानेवारीला पुण्यात पत्रकार परिषदेत जे बोललो ते दिल्लीतील शेतकरी करीत असलेले आंदोलन त्यांनी मागे घ्यावे आणि शरद पवार यांनी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात मध्यस्थी करावी असे मी आवाहन केले होते.मात्र माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊन तसेच जे मी बोललोच नाही ते वक्तव्य माझ्या तोंडी टाकून काही लोक माझ्याबद्दल जो गैरसमज पसरवीत आहेत ते चुकीचे आहे. त्यामुळेच हा खुलासा मी करीत आहे,असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कळविले आहे.

शेतकऱ्यांचा अवमान आम्ही कधीही केला नाही- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 
we have never insulted farmers - union minister of state ramdas athawale 
 
Top