पंढरपूर शहर व तालुका परीट समाजाच्या मिटींग मध्ये मागणी

पंढरपूर,प्रतिनिधी -पंढरपूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांनी राजीनामे दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर परीट समाजाचे शहराध्यक्ष विजय वरपे यांची निवड करावी यासाठी आज पंढरपूर येथे जिल्हाध्यक्ष संजय मामा घोडके व तालुकाध्यक्ष गणेश ननवरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष मिटींग संपन्न झाली आणि या मिटींगमध्ये एकमताने विजय वरपे यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिफारस करण्यात आली.

       विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी परीट समाजातील विजय वरपे यांना संधी द्यावी अशी मागणी समाजाच्यावतीने करण्यात आली आहे असे जिल्हाध्यक्ष संजय मामा घोडके यांनी सांगितले.

पंढरपूर नगरपालिका स्वीकृत नगरसेवकपदी विजय वरपे यांची निवड करावी vijay warpe should be selected as the approved corporator of pandharpur municipality
 
Top