कुर्डूवाडी शहरामध्ये माझी वसुंधरा अभियान 

कुर्डुवाडी,(राहुल धोका),०२/०१/२०२१-कुर्डूवाडी शहरामध्ये नवीन वर्षात मुख्याधिकारी समीर भूमकर व स्वछता अभियंता कोमल वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान हरित शपथ घेण्याचा कार्यक्रम होत आहे.

माझी वसुंधरा अभियान जनजागृती करण्यासाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन

   या कार्यक्रमात कुर्डूवाडी नगरपरिषद कार्यालय, जोतिबा फुले कॉलेज,नूतन विद्यालय,आंतरभारती विद्यालय,आदर्श पब्लिक स्कूल,के.एन.भिसे कॉलेज,जिव्हाळा सुसंस्कार विद्या मंदीर या सात ठिकाणी हरित शपथ विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांना देण्यात आली आहे. शपथ देत असताना सर्व शिक्षक-शिक्षिका,मुख्याध्यापक, प्राचार्या, विद्यार्थी हजर होते. तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२१ आणि माझी वसुंधरा अभियान जनजागृती करण्यासाठी खुल्या स्पर्धेचे ही आयोजन ४ ते ८ जानेवारी करण्यात आले आहे .स्पर्धेच्याही सुचना शाळेत देण्यात आल्या असून हरित शपथ झाल्यानंतर निसर्गाच्या संबंधित पृथ्वी,वायू,जल,अग्नी,आकाश या पंचतत्वे संवर्धन कर्णयकरिता तसेच निसर्ग पूरक जीवन पद्धती अवलंब करून पर्यावरणाचे व निसर्गाचे संतुलन राखले जावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे .हरित शपथ स्वच्छता निरीक्षक तुकाराम विष्णु पायगण यांनी दिली.  

    कार्यक्रमाचे नियोजन शहर समन्वयक अभिजित पवार, फयाज शेख करत आहेत. हरित शपथसाठी मुकादम सुरेश कदम,शिवाजी खवळे,स्वछता दूत दत्ता गायकवाड,सागर बागल,अविनाश गोडगे, आकाश गोडगे,अक्षय तोमर,संदीप ढावरे,विक्रम  बागल या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला .
 
Top