नामांतर लढ्यातील योद्द्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते दि.१९ जानेवारी रोजी माता रमाबाई आंबेडकर नगरात सत्कार
मुंबई दि.१८ - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे यासाठी सतत १६ वर्षे संघर्ष करणाऱ्या लढवय्या भीमसैनिक योद्द्यांचा जाहीर सत्कार मंगळवार दि.१९ जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामांतराचे शिल्पकार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नामांतराच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त नामांतर लढ्यातील योद्द्यांचा सरकार सोहळा घाटकोपर पूर्वेतील माता रमाबाई आंबेडकरनगर येथील शहिद स्मारक सभागृहत दि.१९ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती रिपाइंचे महाराष्ट्र् राज्य उपाध्यक्ष डी एम चव्हाण मामा,चिंतामण गांगुर्डे,राजाभाऊ गांगुर्डे, काका गौंगुर्डे ,नंदू साठे यांनी दिली आहे.

नामांतर लढ्यातील योद्ध्यांचा सत्कार सोहळ्यात पँथरचे संस्थापक दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ, प्रा.अरुण कांबळे या दिवंगत मान्यवरांसह रिपाइं चे माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर,गौतम सोनवणे यांचाही सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांतर्फे देण्यात आली आहे.

लढवय्या भीमसैनिक योद्द्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते सत्कार union Minyister of state ramdas athawale felicitates warriors
 
Top