श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरास फुलांची मनमोहक आरास

पंढरपूर - दि. १४/०१/२०२१ मकर संक्रांति निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी vithal rukmini मातेच्या गाभाऱ्यात तसेच संपूर्ण मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरास temple मनमोहक स्वरूप प्राप्त झाले होते. फुलांची आरास ही पुणे येथील नवनाथ भिशे आणि भारत भुजबळ यांच्यावतीने करण्यात आली होती.

     या आरासीसाठी झेंडू,शेवंती,कार्नेशन,आष्टर, ऑर्किट, बिजली,ग्लाँडिओ,एँनथरियम या फुलांची रंगसंगती वापर करून सुंदर आरास करण्यात आली होती.ही आरास विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कर्मचारी आणि भुजबळ ब्रदर्स आणि डेकोरेटर्स पुणे यांच्यावतीने करण्यात आली होती.

एक लाख एक हजार एकशे एक रुपयांची देणगी

तसेच दिनांक १४/०१/२०२१ रोजी प्रतापराव वसंतराव सावंत यांच्या स्मरणार्थ श्रीमती निर्मला प्रतापराव सावंत,राहणार एलआयसी पाठीमागे, घनश्याम सोसायटी,पंढरपूर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अन्नछत्र करिता ७६ हजार एकशे एक रुपये व गो शाळेकरिता पंचवीस हजार रुपये असे एकूण रक्कम एक लाख एक हजार एकशे एक रुपये देणगी स्वरुपात देण्यात आले.


          त्यावेळी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीच्यावतीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रीमती निर्मला प्रतापराव सावंत यांचा सत्कार श्रींची प्रतिमा उपरणे देऊन करण्यात आला. यावेळी मंदिरे समिती अन्नछत्र विभाग प्रमुख बलभीम पावले व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरास फुलांची मनमोहक आरास 
temple is adorned with flowers, including tomb of Vitthal Rukmini
 
Top