पंढरपूर तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीची निवडणूक

       पंढरपूर,दि.०२/०१/२०२१- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.पंढरपूर तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून,निवडणूकीसाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

       ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ साठी तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीसाठी १ लाख ९ हजार १९४ पुरुष मतदार व ९६ हजार २०६ स्त्री मतदार तसेच इतर ०१ असे एकूण २ लाख ५ हजार ४०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

       या निवडणुकीसाठी ७२ ग्रामपंचायतीसाठी २७९ प्रभाग तर यासाठी एकूण सदस्य संख्या ७७६ आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५० निवडणुक निर्णय अधिकारी तसेच एक हजार ३८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार विवेक सांळुखे,निवडणुक नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे,महसूल सहाय्यक एस.बी.कदम यांच्यासह इतर कर्मचारी पुढाकार घेत असल्याचे उपविभागीय अधिकारी ढोले यांनी सांगितले.

         छाननीत ३३ अर्ज अपात्र

     ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ साठी तालुक्यातील ७२ ग्रामपंचायती निवडणूकी साठी ३ हजार ३३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.त्यापैकी छाननीत ३३ अर्ज अपात्र झाले आहेत.दि.०४ जानेवारी दुपारी ३.०० वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत असून, त्या नंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार असल्याचेही श्री.ढोले यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुका प्रशासन सज्ज - उपविभागीय अधिकारी सचिन ढोले taluka administration ready for gram panchayat elections - sub-divisional officer sachin dhole 
 
Top