तंत्रशिक्षणातील सर्वोच्च मानांकन एन.बी.ए.ला पालकांची जास्त पसंती
पंढरपूर,०८/०१/२०२१- शैक्षणिक वर्ष २०२०- २०२१ मध्ये गोपाळपूर ,ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग हे १००% ऍडमिशन पूर्ण झालेले एकमेव खाजगी महा विद्यालय ठरले आहे तसेच डिग्री इंजिनिअरिंगच्या प्रथम व थेट द्वितीय वर्ष प्रवेशालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.' अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
स्वेरीतील एन.बी.ए.मानांकित अभियांत्रिकी कोर्सेस असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेश सन २०२०-२१ करीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे,भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी,छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील संचालक,तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र म्हणून मान्यता दिली होती.
सलग तीन वर्ष १००% ऍडमिशन पुर्ण होणारे एकमेव खाजगी डिप्लोमा महाविद्यालय
सलग तीन वर्ष १००% ऍडमिशन पुर्ण होणारे महाराष्ट्रातील एकमेव खाजगी डिप्लोमा महाविद्यालय आहे.महाराष्ट्र व गोवा राज्य शासना कडून बेस्ट पॉलीटेक्निक अवॉर्डनेही या कॉलेजला सन्मानित केलेले आहे.
प्रवेश प्रक्रियेत स्वेरी कॉलेजला मिळालेला विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे सर यांचे विशेष मार्गदर्शन,कार्यतत्पर असणारा तज्ञ शिक्षक वर्ग व प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांचे नेतृत्व या सर्व गोष्टींचे फलित म्हणजे प्रवेश प्रक्रियेत स्वेरी कॉलेजला मिळालेला विद्यार्थी व पालक यांचा प्रचंड प्रतिसाद होय.
स्वेरी इंजिनिअरिंग शंभर टक्के ऍडमिशन पूर्ण झालेले राज्यातील एकमेव खाजगी महाविद्यालय
sveri engineering is only private college in state to have completed hundred percent admission