रेल्वे सुरु करण्याबाबत रेल प्रबंधकांना निवेदन 

   पंढरपूर - सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसींच्या वतीने जिल्हा अध्यक्ष समिर कोळी यांनी पंढरपूर रेल प्रबंधकांना पंढरपूर येथील रेल्वे लवकरात लवकर चालू करण्यात यावी.पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे देशभरातून पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची गर्दी खूप असते. कोरोना पार्शभूमीवर बंद झालेली रेल्वे आता सुरळीत चालू करण्यात यावी अन्यथा सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसींच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल या आशयाचे निवेदन देण्यात आले.

   यावेळी मा.शहराध्यक्ष सुहास भाळवणकर,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप शिंदे,युवक काँग्रेसचे सोमनाथ आरे, शहर काँग्रेस सरचिटणीस बाळासाहेब आसबे,काँग्रेस जेष्ठनेते मिलींद आढवळकर,शकील रत्नपारखी,अरबाज रत्नपारखी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा काँग्रेस ओबीसींच्यावतीने रेल्वे सुरु करण्याबाबत रेल प्रबंधकांना निवेदन statement to railway managers regarding commencement of Railways on behalf of district congress OBC
 
Top