इसबावी येथे तलाठी कार्यालय सुरू करण्याची मा.नगरसेवक बालाजी मलपे यांची मागणी

        पंढरपूर,(प्रतिनिधी),१२/०१/२०२१ -पंढरपूर शहरातील सर्वात मोठे उपनगर असलेल्या इसबावी भागाकरिता स्वतंञ तलाठी कार्यालय करण्याची मागणी पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बालाजी मलपे यांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

          गेल्या अनेक वर्षांपासून इसबावीचे तलाठी कार्यालय हे पंढरपूर तालुक्यातील इसबावीपासून पाच ते सहा कि.मी.लांब असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत येथे टाकळी व इसबावी असे एकञीत आहेत.परंतु इसबावी हा भाग जेव्हापासून पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत घेण्यात आला तेव्हापासून या भागातील नागरी वसाहत झपाट्याने वाढत आहे. त्याकामी लागणाऱ्या महसुल कागदपञांसाठी नागरिकांना वारंवार पाच ते सहा कि.मी.अंतरावर हेलपाटे मारावे लागत आहेत. याचा नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून नाहक ञास सहन करावा लागत असल्याने मा.नगरसेवक बालाजी मलपे यांनी इसबावी येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय करण्याची मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

इसबावी येथे तलाठी कार्यालय सुरू करा- मा.नगरसेवक बालाजी मलपे 
start talathi office at isbawi- former corporator balaji malpe
 
Top