एकवीस लाख एक्क्वान हजारचा मुद्देमालासह ५ ट्रँक्टर केले जप्त 

कुर्डूवाडी पोलिसांना सर्व आरोपी पकडण्यात आले यश


  कुर्डूवाडी,(राहुल धोका),१०/०१/२०२१- म्हैसगाव –शिराळ येथील बंधार्यातून अवैध वाळू चोरी होत आल्याची खबर नाव उघड न करता सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर  सोलापूर ग्रामीणचे विशेष पथकाने धडक कारवाई करत यांनी दु १२ वाजून ३० मिनिटानी घटनास्थळी दाखल झाले असता या ठिकाणी ६००००० किमतीचा एक महिंद्र अर्जुन टँक्टर ट्रालीसह  अंदाजे एक ब्रास वाळू विना नंबर चालक सागर बोरकर ,मालक संतोष बोरकर,६०७००० किमतीचा महिंद्र अर्जुन टँक्टर ट्रालीसह विनानंबर अंदाजे एक ब्रास वाळू, चालक दिपक जगताप  ६०७००० किमतीचा महिंद्र अर्जुन कंपनीचा विना नंबर चालक योगेश गिरी, ३०३००० किमतीचा टाटा कंपनीचा टम्पो चालक बंडू सरवदे तसेच विना क्रमांकाची जुनी मोटारसायकल असा  अंदाजे एकूण एकवीस लाख एक्क्वन हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे.


       यावेळी सोलापूर विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक विनय बहिर,पो.क.कल्याण भोईटे ,पो.क सतीश एनगुले यांनी गरडा घालून कारवाई सुरु केली असता संबंधित व्यक्ती पळून गेले मात्र यात वाळू भरणारा सागर बोरकर, वय ३० यास पकडण्यात पथकास यश आले आहे. 


      त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर वाळू उपसा अवैध चालू होता. यानंतर कुर्डूवाडी पोलीस स्टेशन येथे फोन करून मदत मागवण्यात आली.कुर्डूवाडी हेड.काँ.नितीन गोरे, पो.क.अंबादास ससाणे ,पो.क.ओम दासरे,पो.क.रामलिंग नाईकनवरे घटनास्थळी पोलीस कर्मचार्यांसह हजर झाले असता हकीगत सांगून मुद्देमाल त्यांना कार्यवाहीसाठी ताब्यात दिला असून पो.क मनोज राठोड यांनी याबबत सागर बोरकर, वय २०, संतोष बोरकर,वय ३४, दिपक जगताप ,वय ३२ , योगेश गिरी,वय ३०,बंडू सरवदे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कुर्डूवाडी पोलिसांनी सर्व आरोपींना पकडले असल्याची माहिती मिळाली आहे.पुढील तपास हवालदार बाबासाहेब घाडगे करत आहेत.

म्हैसगाव येथे अवैध वाळू उपश्यावर विशेष पोलिस पथकाची धडक कारवाई 
special police squad cracks down on illegal sand mining in mhesgaon
 
Top