पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने माझी वसुंधरा अभियान

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत शपथ घेण्याचा कार्यक्रम आणि सर्व अधिकारी कर्मचारी व सफाई कर्मचारी यांना कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल सन्मानपत्र देण्याचा कार्यक्रम व गणवेश वाटपाचा कार्यक्रम आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पक्षनेते अनिल अंभगराव,पक्षनेते गुरूदास अभ्यंकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी, नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

अधिकारी कर्मचारी सफाई कर्मचा-यांना सन्मान चिन्हाचे वाटप


            यावेळी माजी वसुंधरा या अभियानाची शपथ सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. तसेच सफाई कर्मचारी यांना गणवेश वाटप करण्यात आला. माझी वसुंधरा ही अभियान शासन संपूर्ण महाराष्ट्र भर राबवत आहे. याची संकल्पना व माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सर्वांना दिली.


यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले की पंढरपूर हे हरित व्हावे या हेतूने विशेष प्रयत्न करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे व भविष्यात सुद्धा करण्यात येणार आहे.निसर्गाचा समतोल राखावा व पंढरपुर प्रदुषण मुक्त रहावे म्हणून माझी वसंधुरा अभियान सर्वापर्यत पोहचवावे असे आवाहन केले. नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहेत त्यासाठी मी स्वतः लक्ष घालून शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.


आमदार प्रशांत परिचारक यांनी लॉकडाउन व कोरोना कालावधीत चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल नगराध्यक्षा, मुख्याधिकारी,आरोग्य सभापती व सर्व अधिकारी,कर्मचारी , सर्व सफाई कर्मचारी यांचे अभिनंदन केले व सर्वांना सन्मान पत्र देवुन गौरवोद्गार काढले. 

सहज हातातुन नेता येणारा स्पिकर सभापती परदेशी यांनी दिला भेट


      यावेळी आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी यांनी नगरपरिषदेत २० पीपीई किट व कोरोनामुक्त पंढरपूर अभियानासाठी व इतर जनजागृतीसाठी सहज हातातुन नेता येणारा आहुजा या नामवंत कंपनीचा स्पिकर भेट दिला. या स्पिकरच्या माध्यमातून शहरामध्ये ज्या रिक्षा जात नाही अशी गल्लीबोळात या स्पिकरद्वारे सहज गळ्यात अडकवून जनजागृती करता येईल. पुढील काही दिवसातच पंढरपूरात जनजागृती साठीचा हा टप्पा पुर्ण होईल.या स्पिकरच्या मदतीने कमी श्रमात,कमी खर्चात, जास्तीत जास्त भागात जनजागृती राबणार असल्याचे सभापती परदेशी यांनी सांगितले .सर्व कर्मचाऱ्यांना अर्सेनिक अल्बम ३० औषध देण्यात आले आणि पिपीई किट भेट देण्यात आली.


      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य अधिकारी शरद वाघमारे,आरोग्य निरिक्षक नागनाथ तोडकर यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते धर्मराज घोडके, नवनाथ रानगट, गुरु दोडीया, बाळासाहेब थोपटे, मलेरिया विभागाचे किरण मंजुळ व सर्व विभागातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. 

        या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल वाळुजकर यांनी केले.आभार विवेक परदेशी यांनी मानले.

पंढरपूर हे हरित व्हावे या हेतूने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत -आमदार प्रशांत परिचारक 
special efforts are being made to make pandharpur green - mla prashant paricharak
 
Top