ग्रामपंचायत निवडणूकित रिपब्लिकन कार्यकर्त्याना जशी ताकद दाखवली तशीच आगामी महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवा - सौ.सीमाताई आठवले
      मुंबई - राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चमकदार कामगिरी करून रिपाइंची ताकद दाखविली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत काम केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याचे पक्षाध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी कौतुक केले आहे.ग्राम पंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जशी ताकद दाखविली तशीच आगामी महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवावी.त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ सीमाताई आठवले यांनी केले आहे.

रामदास आठवले साहेबांचे हात मजबूत करा

        आगामी काळात मुंबई,नाशिक,नवी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आदी महानगरांच्या महापालिका निवडणुका होत आहेत. या सर्व महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेबांचे हात मजबूत करा, रिपब्लिकन पक्ष मजबूत करा असे आवाहन सौ सीमाताई आठवले यांनी केले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची चमकदार कामगिरी

        राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात अंदाजे ४ हजार सदस्य रिपाइं चे निवडून आले असल्याची माहिती मिळाली आहे. सोलापूर ते अहमदनगर आदी अनेक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चमकदार कामगिरी केली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बागेहल्ळी गावात रिपाइंचे सर्व पॅनल स्वबळावर निवडुन आले असून प्रस्थापित पक्षांना या गावात रिपाइंने जबरदस्त धक्का दिला आहे.रिपाइंच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन सौ.सीमाताई आठवले यांनी केले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवा- सौ.सीमाताई आठवले 
show strength of republican party in upcoming municipal elections - mrs.seematai athawale
 
Top