ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची वाखरीतून बिनविरोध सलामी


    पंढरपूर,०६/०१/२०२१- राज्याबरोबरच पंढरपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस पहावयास मिळत आहे.पंढरपूर तालुक्यात गाव पातळीवरील आघाडीच्या माध्यमातून निवडणूका लढवल्या जात आहेत.यात शिवसेनेनेही उमेदवार मैदानात उतरवले असून समविचारी आघाडीसोबत हे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत ,अशी माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख महावीर देशमुख यांनी दिली.

         वाखरी येथे शिवसेनेचे संजय अभंगराव आणि सर्जेराव पांढरे हे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून या माध्यमातून शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सलामी दिली आहे.या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे अनेक उमेदवार विजयी होतील असा विश्वास महावीर देशमुख यांनी व्यक्त केला आहे .  

         वाखरी ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध विजयी झालेले जेष्ठ शिवसैनिक संजय अभंगराव व सर्जेराव पांढरेंचा पंढरपूर तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव,शहर प्रमुख रवींद्र मुळे,युवा सेना शहर प्रमुख महावीर अभंगराव,उपशहर प्रमुख पोपट सावंतराव,उपशहर प्रमुख लंकेश बुराडे,अविनाश वाळके यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गावपातळीवर आघाड्यात शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील - महावीर देशमुख
shivsena candidates will win at village level - mahavir deshmukh

 
Top