पंढरपूरात शैला गोडसे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद‌्घाटन

      पंढरपूर,१०/०१/२०२१- पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे. मात्र सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन येताना कार्यकर्ते, नागरिकांना शहरात हक्काचे कार्यालय नव्हते.मात्र तो प्रश्न आता जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे यांनी दूर केला आहे.त्यांनी पंढरपूरच्या मध्यभागात समस्याग्रस्त शेतकरी, कार्यकर्त्यांना हक्काचे कार्यालय उपलब्ध करून दिल्याने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्याचा सर्वाधिक प्रयत्न होईल,असे मत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत यांनी व्यक्त केला. पंढरपूर-मंगळवेढ्याची विधानसभेची जागा ही शिवसेनेची होती.त्यामुळे शिवसेना आपला हक्क त्यावर सांगणार असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पक्ष नेतृत्वाने स्वबळावर लढा,असा आदेश दिल्यास सर्वसामान्य शिवसैनिक तयारच

        पंढरपूर येथे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांच्या संपर्क कार्यालय उद‌्घाटनप्रसंगी प्रा. शिवाजी सावंत बोलत होते.यावेळी सावंत यांनी आ.भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची जागा रिक्त झाली आहे.यापूर्वी त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार उभा होता. मात्र पुन्हा युती झाली, ती जागा भाजपाकडे गेली. भाजपाने ती जागा मित्र पक्षाला दिली.त्यामुळे आम्ही आघाडीचा धर्म पाळत दोन पावले मागे घेतली होती.सध्या राज्यात आघाडीचे तीन पक्षाचे सरकार आहे.वेळ कधी बदलेल,काय सांगता येत नाही.पक्ष नेतृत्वाने स्व बळावर लढा,असा आदेश दिल्यास सर्वसामान्य शिवसैनिक तयारच असेल,असेही सावंत यांनी सांगितले.

त्यावेळी शैला गोडसे यांच्यावर अन्याय झाला

         शैला गोडसे यांनी मागील विधानसभा निवडणुकीवेळी पक्ष घराघरात जाऊन वाढविला.त्यांना निवडणूक लढविण्या साठी उमेदवारी मिळणे गरजेचे असताना त्यावेळी त्यांच्यावर अन्याय झाला.आता ही जागा राष्ट्रवादीची असली तरी शिवसेनेने निवडणूक लढवायची तयारी ठेवावी,असेही शिवाजी सावंत म्हणाले.

       यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे, माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव,भैरवनाथचे उपाध्यक्ष अनिल सावंत,तालुका प्रमुख महावीर देशमुख,शहर प्रमुख रवींद्र मुळे,ग्राहक संरक्षक जिल्हा प्रमुख जयवंत माने,अरूण कोळी,शहर महिला आघाडी प्रमुख पूर्वा पांढरे,सुप्रिया कदम संगीता पवार, उपशहरप्रमुख लंकेश बुराडे, विनय वनारे,नाना सावतराव,तानाजी मोरे,पंकज डांगे, सिद्धेश्वर कोरे,विनोद कदम यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

शैला गोडसे यांच्या संपर्क कार्यालयामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल-शिवाजी सावंत 
shaila godses sampark karyalay will help solve peoples problems - shivaji sawant
 
Top