चांगले काम करणारे सरपंचाना बेस्ट सरपंच म्हणून गौरव करणार - सिईओ स्वामी

पंढरपूर,(नागेश आदापुरे),२४/०१/२०२१-ग्राम विकासासाठी पुढे या. काम करणारे सरंपचांना बेस्ट सरपंच पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जाहिर केले.

     पंढरपूर येथे आज तालुक्यांतील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या संवाद कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील, उद्योजक अभिजीत पाटील, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मनसेचे सहकार विभागाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.

    संवाद समृध्द गावाचा या विषयावर बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, गावांच्या विकासासाठी पुढे या.निवडणुका झाल्या. विकासासाठी आता पुढे या.विकास म्हणजे केवळ बौध्दिक विकास नाही. मिळालेल्या संधीचं आता सोनं करा. गरजेवर आधारीत गावांच्या विकास कामाचे नियोजन करा. या योजनांचा लोकांना कसा वापर होईल याचा विचार करा. कामात चढाओढ पेक्षा निकोप स्पर्धा ठेवा. जिल्हयात सरपंचाचा सरपंच क्लब करून चांगले काम करणारे सरपंच यांचा दरमहा कामाचा आलेख पाहून बेस्ट सरपंच म्हणून गौरव करणेत येणार आहे. हा गौरव सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह करणेत येणार आहे,असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व मादी सरंपच भास्करराव पेरे पाटील यांचा श्री विठ्ठलाची मुर्ती व शाल पुष्पहार घालून स्वागत करणेत आले.प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करणेत आले.

वृक्ष हे पावसाचे ATM - भास्करराव पेरे पाटील


  निसर्गाचे आपण देणं लागतो.वृक्ष लागवड करा. केवळ लोकसंख्येनुसार नाही तर प्राण्यांना देखील आँक्सीजन लागतो. त्याच्यासह नियोजन करा. सांगोल्यातून दोन एकर जागा दान देत असल्याचा फोन आला असल्याचे सांगून पेरे पाटील म्हणाले मुलीचा झालेला पराभव सांगोल्यातील बाबर नावाचे शेतकरी यांना सहन झाला नाही त्यांनी दोन एकर जागा देतो तुम्ही इकडे येऊन रहा असे सांगितले. 

      ग्रामसेवक या गावाचा महत्वाचा दुवा आहे. अधिकारी व ग्रामसेवक यांना नाराज करू नका. ग्रामसेवक जो करू शकतो तो कुणीच करू शकत नाही.१५- ७५- नवीन योजना तयार करीत आहोत. तुम्ही किमान १५ ते ७५ झाले २६ जानेवारीला लावा.फळांची झाडे लावा.माझे गावाचा टॅक्स १ एप्रिलला जमा होतो.जे टॅक्स भरतात त्याचे हस्ते. ध्वजारोहण करा. गावाचे उत्पन्न वाढल्याशिवाय पर्याय नाही. पाच वर्षानंतर पुढील निवडणुकीस उभारणार नाही असे समजून काम करा. ही संधी आहे. माझेसारखे काम दुसरे कुणी केलं नाही म्हणून मला संधी मिळाली. 


     बिनविरोध ग्रामपंचायत झाल्याबद्दल जैनवाडी या गावाला उद्योगपती अभिजीत पाटील यांच्या वतीने एक लाख रुपये देऊन गावचा सन्मान करण्यात आला. 
  

    यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या व पुढील कार्यासाठी आपले मनोगत व्यक्त केले .


     अभिजीत पाटील यांनी गावचा विकास करण्या बाबत व विविध प्रकारचे शिबिर घेऊन गावांमध्ये जास्तीत जास्त सुख सुविधा कशा उपलब्ध होतील याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक गावांमधून एक फॉर्म भरून घेऊन गावांमधील पाच लोकांची नावे व मोबाईल नंबर घेऊन गावांमधील अडीअडचणी सोडवण्यासाठी व विकास कामाची माहिती देऊन आपले गाव समृद्ध करण्याचे आव्हान केले. 

       प्रास्ताविक उद्योजक अभिजीत पाटील यांनी केले. त्यांनी प्रास्तविक भाषणात ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.कमी क्षेत्रात जास्त ऊसाचे उत्पन्न मिळेल यांचे.नियोजन करता येईल.बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी केलेल्या आवाहनास राज्यभर प्रतिसाद मिळाला.यासाठी बरेच आमदार मंडळीनी पुढाकार घेतला असल्याचे सांगून जिल्ह्यात ६३ पेक्षा अधिक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे सांगितले.

         या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन पवार यांनी केले. आभार प्रा.तुकाराम मस्के यांनी मानले.
 
Top