आमदार संजयमामा शिंदेंच्या आवाहनला प्रतिसाद सापटणे भोसे बिनविरोध

कुर्डुवाडी,(राहुल‌ धोका) -सापटणे (भोसे), ता. माढा ग्रामपंचायत बिनविरोध झाली असुन ९ ग्राम सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये केवळ ९ च अर्जच राहिल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडीची केवळ औपचारिक प्रकिया राहिली आहे. गावातील अस्लम काझी,बालाजी गिड्डे, हनुमंत गिड्डे व ग्रामवासियांनी बैठक घेवून गाव कल्याण तसेच कोरोनाची पार्श्वभुमीवर यावेळी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.

याबाबत करमाळा माढा आमदार संजयमामा शिंदे यांचे ग्रामपंचायती बिनविरोधसाठी प्रयत्न चालु होते.१५ लाखाचे बक्षिस यासाठी तयाांनी जाहिर केले होते. माढा - करमाळा मतदार संघातील आणखीन सहा ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता असुन अर्ज माघारी घेण्याची प्रकिया समाप्त होताच संपुर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

   सापटणे भोसे येथील स्वाती गिड्डे,रोहीणी राऊत, जयश्री गिड्डे,बाळासाहेब घाडगे,राजेंद्र भालेराव, बालाजी गिड्डे,अनिता मुसळे,बालाजी अवचर, दिपाली गिड्डे यांचेच अर्ज राहिले आहेत.

आमदार संजयमामा शिंदेंच्या आवाहनला प्रतिसाद सापटणे भोसे बिनविरोध
 sapatne bhose unopposed to respond to mla sanjaymama shindes appeal
 
Top